Eknath Khadse : खडसे-महाजन वाद पेटला? खडसेंनी थेट महाजनांना सल्लाच दिला; म्हणाले, 'माझं नाव घेऊन उगाच...'

Eknath Khadse On Girish Mahajan : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि महायुतीचे मंत्री गिरीश महाजन यांच्यात सध्या वाद उफाळला आहे. खडसे यांनी महाजन यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांना महाजन यांनी उत्तर दिले होते. तर 'मी जर तोंड उघडलं तर तुम्हाला लोक जोड्याने मारतील', असे वक्तव्य केलं होतं.
Eknath Khadse, Girish Mahajan
Eknath Khadse, Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : राज्यात सध्या विविध विषयावरून आरोप-प्रत्यारोपांची राळ उधळली जातेय. आताही माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा आरोप केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. खडसे यांनी भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप करताना, महाजन यांच्या ‘रंगल्या रात्री अशा’ असे म्हटले होते. तर त्यांचे एका आयएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत, त्या महिलेचे नाव देखील मला माहिती आहे. मात्र ते नाव सांगणार नाही, असे म्हणत आरोप केला होता. यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यावरून महाजन यांनी स्पष्टीकरण देताना खडसेंच्या आरोपांचा समाचार घेतला होता. तसेच 'मी जर तोंड उघडलं तर तुम्हाला लोक जोड्याने मारतील', असे वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे आता वादात तेल पडले आहे. यावरून पुन्हा एकदा खडसे यांनी महाजनांना लक्ष केलं आहे.

भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप मी केला नव्हता. याबाबत कोणी आरोप केले, त्यांनी त्याची माहिती घ्यावी. अमित शहा यांच्याकडे या संदर्भातला सीडीआर उपलब्ध आहे, असं सुद्धा आरोप करणाऱ्याने सांगितलं आहे. त्यामुळे उगाच गिरीश महाजन यांनी माझं नाव घेऊन आदळ आपट करण्याची गरज नाही. त्यांनी पुरावे मागायचे असतील, तर आरोप करणाऱ्यांकडे मागावेत, असा सल्ला देखील एकनाथ खडसे यांनी दिला.

खडसे यांनी एका पत्रकाराचे नाव घेत महाजन यांच्यावर आरोप केले होते. तर महाजन यांच्या ‘रंगल्या रात्री अशा’ होत्या. त्यांचे एका आयएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध होते. जिचे नाव आपल्याला माहित असून ते सांगणार नाही. पण मंत्रिमंडळाचा विस्तारावेळी महाजन यांची कान उघडणी अमित शहांनी बैठकीत केली होती.

Eknath Khadse, Girish Mahajan
Eknath Khadse on Girish Mahajan : गिरीश महाजन यांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध, एकनाथ खडसेंनी फोडला नवा बॉम्ब

त्या बैठकीत विचारणा झाल्यावर आपले फक्त महिला आयएस अधिकाऱ्यांसोबत कामानिमित्त बोलणं सुरू असते त्यांनी सांगितले होते. पण शहांनी, त्यांना आपल्याकडे संपूर्ण कॉल रेकॉर्ड असून रात्री दीड वाजेनंतर त्या महिला अधिकाऱ्याला 100 कॉल झाल्याचे सांगितल्याचाही म्हटलं होतं. खडसे यांच्याकडून असे आरोप होत असताना महाजन यांनवी संतप्त प्रतिक्रिया देताना सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच खडसेंनाच आव्हान दिलं होते.

महाजन यांनी, 'मी जर तोंड उघडलं तर तुम्हाला लोक जोड्याने मारतील', अशी प्रतिक्रिया दिली होती. खडसे यांच्याकडे कोणताही पुरावा असेल तर दाखवावा असेही आव्हान दिले होते. तर याबाबत एक देखील पुरावा दाखवला तर आपण मी सक्रिय राजकारण सोडू, असे ही त्यांनी म्हटलं होतं. आता माझा अंत पाहू नका, मी फक्त एका गोष्टींचा खुलासा केला तर तुम्हाला तोंड काळं करावं लागेल असाही इशारा दिला होता.

Eknath Khadse, Girish Mahajan
Eknath Khadse Politics: एकनाथ खडसे यांची घरवापसी रखडली, गिरीश महाजनांपुढे दिल्लीचेही पान हालेना?

या इशाऱ्यानंतर आता खडसे यांनी पुन्हा एकदा पलटवार केला असून महाजन यांच्यावर आरोप मी केला नव्हता. याबाबत कोणी आरोप केले, त्यांनी त्याची माहिती आधी घ्यावी. अमित शहा यांच्याकडे या संदर्भातला सीडीआर उपलब्ध आहेत. हे एका पत्रकारानेच आधी सांगितले आहे. यामुळे उगाच गिरीश महाजन यांनी माझं नाव घेऊन आदळ आपट करण्याची गरज नाही. त्यांनी पुरावे मागायचे असतील, तर आरोप करणाऱ्यांकडे मागावेत, असा सल्ला देखील एकनाथ खडसे यांनी दिला आहे. आता या सल्ल्यावर महाजन कोणती प्रतिक्रिया देतात हे पहावे लागतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com