कॉंग्रेससह तयार होत असलेल्या आघाडीला नेतृत्व देण्याचे काम शरद पवारांचे!

राष्ट्रवादी काँग्रेस ममता बॅनर्जींसोबत राहणार की कॉंग्रेससोबत? (NCP With TMC or congress)
Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आम्ही ममता बॅनर्जींसोबत राहणार की कॉंग्रेससोबत राहणार याची चिंता काहींना वाटत आहे. परंतु जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे शरद पवार खरे चाणक्य आहेत, हे लक्षात घ्यावं असं म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

नवाब मलिक म्हणाले, या देशात विविध प्रश्नांवर ज्यापध्दतीने युपीएच्या बैठका व्हायला हव्या होत्या त्या झाल्या नाहीत हि सत्य परिस्थिती आहे. पण आता आम्हाला या देशात ममता बॅनर्जी, टीआरएस, सपा, आरजेडी, दक्षिणेतील पक्ष या सर्वांची मोट बांधायची आहे. कॉंग्रेससह एक नवीन आघाडी तयार करायची आहे. सामुहिक नेतृत्व निर्माण करुन ही आघाडी काम करेल आणि यात काँग्रेससोबतत राहणार आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar
चित्रा वाघ, शेलारांचा फुसका बार : सावरकरांविषयीचे ते वक्तव्य शिवसेनेचे नव्हेच!

राष्ट्रवादी काँग्रेस ममता बॅनर्जींसोबत राहणार की कॉंग्रेससोबत? याची चिंता काहींना वाटत आहे. परंतु जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे शरद पवार चाणक्य आहेत, हे लक्षात घ्यावे. शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष महाराष्ट्रात एकत्र येतील असे कोणालाही वाटले नव्हते. पण तशीच परिस्थिती या देशात आहे. बरेच लोक आहेत जे कधी सोबत येणार यावर चर्चा होत नाही. परंतु या सगळ्यांची मोट बांधण्याचे काम शरद पवार करतील. कोणालाही याच्यातून बाहेर काढून ही आघाडी होणार नाही. सगळ्यांचा समावेश करायचा आहे यादृष्टीने ते काम करत आहेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

Sharad Pawar
'शरद पवार फेलोशीप' जाहीर ; कृषी-साहित्य क्षेत्रांतील ९० जण ठरले मानकरी

ममता बॅनर्जी या दोन दिवसांच्या दौर्‍यावर असताना त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आमच्या मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी देशात मोदी सरकारच्याविरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याचे मत मांडले. त्यावर शरद पवारांनी आम्ही सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले असल्याचेही मलिक म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com