Mlc Election: शिवसेनेत उमेदवारीवरून नाराजीनाट्य; एकनाथ शिंदेंच्या निर्णयाने तिघांना बसणार धक्का!

Eknath Shinde Shiv Sena News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवार जाहीर झाल्यानंतरचे नाराजीनाट्य टाळण्यात येणार आहे.
Ekanath Shinde Shiv sena
Ekanath Shinde Shiv senaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्चला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्षात लगबग सुरु आहे. भाजपने रविवारी सकाळीच विधान परिषदेच्या तीन उमेदवार जाहीर करून एकीकडे आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी सोमवारी सकाळी 11 वाजता उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवार जाहीर झाल्यानंतरचे नाराजीनाट्य टाळण्यासाठी उद्या ऐनवेळी उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे.

शिंदेंच्या शिवसेनाचा (Shivsena) उमेदवार निवडीसाठी गेल्या दोन-तीन दिवसापासून बैठकांचे सत्र सुरूच आहे. मात्र, या बैठकीत एका नावावर शिक्कामोर्तब होत नसल्याने चर्चा सुरूच आहे. मात्र, ऐन निवडणूक काळात शिवसेनेत नाराजीनाट्य उफाळून येऊ नये म्हणून शिवसेनेकडून दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे हे नाराजीनाटय टाळण्यासाठी शिवसेनकडून सोमवारी विधान परिषदेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत.

Ekanath Shinde Shiv sena
Ncp Mlc Election : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचा विधान परिषदेचा उमेदवार ठरला ! 'या' दिवशी होणार नावाची घोषणा

शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला एकच जागा आली आहे. या साठी इच्छुक जास्त आहेत. त्यामुळे सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेकडून शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, किरण पांडव अशी चार जणांची नावे चर्चेत आहेत.

या पैकी एक नाव फायनल होणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी हे विधानसभेत गेल्याने त्यांची एक जागा रिक्त आहे. या जागेसाठी कोअर कमिटीने नाव निश्चित केले आहे. नाराजी उफाळून येऊ नये म्हणून सोमवारी नाव घोषित करण्यात येणार आहे.

Ekanath Shinde Shiv sena
Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी घोषणा; आता फोनवरुन 'हॅलो' नाही, तर जय शिवराय बोलायचं....

दरम्यान, भाजपने (Bjp) रविवारी सकाळी त्यांच्या वाट्याला आलेल्या तीन जागेवरील उमेदवारांची घोषणा केली. भाजपने जुन्या-नव्याचा समतोल राखत माजी आमदार दादाराव केचे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, छत्रपती संभाजी नगरचे माजी उपमहापौर संजय केनेकर या तिघांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या एका जागेवरील उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ekanath Shinde Shiv sena
Ajit Pawar : काँग्रेसला मोठा धक्का, दोन बडे नेते अजितदादांच्या गळाला; प्रवेशाचा मुहूर्तही ठरला

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या एक जागेसाठी माजी आमदार झिशान सिद्धकी, संजय दौंड, उमेश पाटील यांना कागदपत्रे गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या तिघांपैकी एकाला विधानपरिषदेवर संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. या तीन नावांपैकी एकाचे नाव सोमवारी घोषित करण्यात येणार आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Ekanath Shinde Shiv sena
Ganesh Naik : गणेश नाईकांनी पुन्हा एकदा सेनेला डिवचले; म्हणाले, 'ठाण्यात सर्वात सिनियर...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com