
Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर राज्यात सत्ता स्थापन केली. सत्तास्थापन करून तीन महिने उलटले तरी या-ना त्या कारणावरून महायुतीमधील तीन पक्षात अंतर्गत कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलेलेच आहे. महायुतीमधील तीनही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी भिवंडी येथील कार्यक्रमात बोलताना मोठे विधान केले. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येणार ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
ठाण्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना घेरण्यासाठी भाजपकडून मंत्री गणेश नाईक यांना ताकद दिली जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे गणेश नाईक यांनी भाषणात केलेल्या एका वक्तव्यावरुन पुन्हा नव्या चर्चां सुरु झाल्या आहेत. "ठाण्यात सर्वात जास्त सिनीयर मंत्री मी आहे", असे गणेश नाईक यांनी एक कार्यक्रमात उघडपणे म्हणत शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाण्यात सर्वात जास्त सिनीयर मंत्री मी आहे. मी कधी कुणाची जात विचारत नाही. माझी जात कुणी विचारलं तर मी अभिमानाने सांगतो, असेही गणेश नाईक (Ganesh Naik) म्हणाले. मी 1990 ला आमदार झालो. ठाण्यात सर्वात जास्त सीनीयर म्हणजे 4 वेळा झालेला मंत्री मी एकटाच आहे. समाजाने ते घडवले. स्पर्धा ही सकारात्मक आणि गुणात्मक असली पाहिजे. द्वेषाची स्पर्धा असता कामा नये", असे देखील गणेश नाईक म्हणाले.
ठाण्यात जनता दरबार भरविण्यावरून महायुतीत गेल्या काही दिवसांपासून राजकारण सुरु आहे. एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. त्यानंतर भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार सुरु केला आहे. त्यामुळे या जनता दरबारची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी नाईक पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यात शिवसेनेकडूनही जनता दरबार सुरु केला जाईल, असे जाहीरपणे म्हटले आहे. त्यामुळे ठाण्यात महायुतीमधील भाजप व शिंदेच्या शिवसेनेत राजकीय चुरस पाहवयास मिळत आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.