Gajanan Kirtikar controversy : शिंदेंना वारंवार अडचणीत आणणाऱ्या कीर्तिकरांविरोधात शिवसेनेत वाढला नाराजीचा सूर; लवकरच मोठा निर्णय ?

Shiv Sena internal conflict News : कीर्तिकरांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीचा सूर असून पक्षश्रेष्ठी लवकरच घेणार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांने दिली.
Gajanan Kirtikar, Eknath Shinde
Gajanan Kirtikar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी मंत्री गजानान कीर्तिकर यांनी दोनच दिवसापूर्वी शिंदे यांच्या शिवसेनेतील धुसफूस चव्हाटयावर आणली होती. एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राज-उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून भाष्य केले होते. यावेळी त्यांनी दोन्ही बंधू एकत्र आले तर बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल, असे सांगितले. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पुढे जाणारी शिवसेना आहे, असे वाटत होते, मात्र, सध्या तसे होताना दिसत नसल्याची टीका कीर्तिकर यांनी केली.

त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील खदखद या निमित्ताने बाहेर आली होती. कीर्तिकरांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीचा सूर असून पक्षश्रेष्ठी लवकरच घेणार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांने दिली.

मनसे व शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या एकत्र येण्यावरून चर्चेला उधाण आले आहे. यावर शिंदे शिवसेनेतील काही नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. शिंदे गटातील अनेक नेते, आमदार, मंत्री हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असताना त्या पार्श्वभूमीवर गजानन कीर्तिकर यांनी केलेले हे वक्तव्य काही जणांच्या जिव्हारी लागले आहे. शिंदे सेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी कीर्तिकर यांनी केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत टीका केली आहे.

Gajanan Kirtikar, Eknath Shinde
Sanjay Rathod controversy : संजय राठोडांच्या अडचणीत भर; उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य ठरणार डोकेदुखी ?

शिवसेना मनसे आणि एकनाथ शिंदे (Ekanath shinde) यांच्याबाबत कीर्तिकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पक्ष्यांमध्ये त्यांच्याविषयी नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कीर्तिकर यांची भूमिका पक्षाला फायदा कमी पण नुकसान पोहोचवणारे जास्त असल्याची नेत्यांमध्ये भावना असल्याचे सूत्रांकडून समजते.कीर्तिकर यांना वरिष्ठांकडून योग्य ती समज देण्यात यावी, अशीही पक्षातील प्रवक्ते आणि वरिष्ठ नेत्यांची भावना आहे.

Gajanan Kirtikar, Eknath Shinde
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या हत्येला सहा महिने पूर्ण; आरोपी कृष्णा आंधळे फरारच; कुटुंब उचलणार मोठं पाऊल

ठाकरे बंधूंसह एकनाथ शिंदे एकत्र येण्यावर कीर्तिकरांनी एक विधान केले होते. एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भाजपप्रणित बनल्याची खोचक टीका त्यांनी केली होती. अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत काम करीत आहे. पण आपल्याला कामाची संधी मिळाली नाही, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे येत्या काळात कीर्तिकर यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी लवकरच महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे समजते.

Gajanan Kirtikar, Eknath Shinde
Fadnavis Shinde Politics : फडणवीस की शिंदे, पुणे अन् कोल्हापूरच्या राजकारणात कोण आघाडीवर? पडद्यामागे नेमके काय घडतय?

ठाकरे बंधू जर एकत्र आलेत तर एकनाथ शिंदे की ठाकरे बंधू कोणासोबत राहणार? असा सवाल केला असता त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले. मात्र अडीच वर्षात शिंदेंनी मला काय दिले? असा सवाल कीर्तिकरांनी केला आणि शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे कीर्तिकर यांच्या विषयी पक्षात नाराजी आहे. त्यामुळे आता येत्या काळात काय पावले उचलली जाणार याकडे लक्ष लागले आहे.

Gajanan Kirtikar, Eknath Shinde
Raj-Uddhav Thackeray Unite : हीच ती वेळ! राज-उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी नेता नव्हे 'ही' व्यक्ती करतेय प्रयत्न!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com