Supreme Court Shiv Sena Case: राज्याच्या सत्तासंघर्षाचा सस्पेन्स कायम; धनुष्यबाण ठाकरे की शिंदेंचा, अंतिम फैसला कधी? सर्वोच्च न्यायालयातून मोठी अपडेट

Supreme Court Shiv Sena Case News : शिवसेना पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण बुधवारी युक्तिवादासाठी आले नाही. या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता कमी असून, सुनावणीसाठी आता पुढच्या आठवड्याची वाट पाहावी लागणार आहे.
supreme court hairing
supreme court hairing Sarkarnama
Published on
Updated on

New Dehli News : सुप्रीम कोर्टात गेल्या महिनाभरापासून शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाच्या चिन्हाबाबत सुनावणी सुरु आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे अपेक्षित होते, मात्र दुसऱ्या एका महत्त्वाच्या प्रकरणामुळे या सुनावणीला वेळ मिळाला नाही. बुधवारी या प्रकरणाची सुनावणी होईल असे वाटत असताना झाली नाही. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण बुधवारी युक्तिवादासाठी आले नाही. या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता कमी असून, सुनावणीसाठी आता पुढच्या आठवड्याची वाट पाहावी लागणार आहे.

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाच्या चिन्हाबाबत सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी प्रभावीपणे मांडली. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यापासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची बाजू नीरज कौल हे मांडत आहेत. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या सुनावणीमुळे लवकरच निर्णय लागण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच गेल्या दोन दिवसापासून हे प्रकरण सुनावणीसाठी आले नाही. त्यामुळे अंतिम फैसलाही पुढे जाण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसापासून सुप्रीम कोर्टात आणखी एक महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीला वेळ मिळाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, यूपीएससी संबंधित मॅटर सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर दोन तास सुरू होते. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण बुधवारी युक्तिवादासाठी आले नाही. उद्याही याच यूपीएससी प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता असल्याने, शिवसेना प्रकरणाची सुनावणी उद्याही होईल की नाही याबाबत अनिश्चितता आहे.

supreme court hairing
Supreme Court Shiv Sena case : सुप्रीम कोर्टात ठाकरेंची भिस्त असलेल्या मुद्दालाच शिंदेंच्या वकिलांनी हात घातलाय; गेमचेंजर ठरणार?

त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय लवकरच या प्रकरणासाठी नवीन तारीख देणार आहे. या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता कमी असून, पक्षचिन्ह प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता पुढच्या आठवड्याची वाट पाहावी लागू शकते, अशी माहिती प्रमोद जगताप यांनी दिली. या आठवड्यात सुनावणी झाली नसल्याने आता निकाल लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे आता दोन्ही गोटात धाकधूक वाढली आहे.

supreme court hairing
Supreme Court Shiv Sena case : शिवसेना पक्ष व चिन्हावरील सुनावणी संपली; दुसऱ्या दिवशी बाजू मांडल्यानंतर शिंदेंच्या वकिलांनी कोर्टातच दिली महत्त्वाची अपडेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com