Shivendraraje Bhosale statement : मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे मोठे विधान; म्हणाले, 'सीएम फडणवीसांनी कधीही...'

Maratha reservation News : मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतलेल्या या भूमिकेला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. त्यातच आता मराठा समाज उपसमितीमध्ये असलेल्या मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठे विधान केले आहे.
Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosale Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यभरातील मराठा समाजाने मुंबईमधील आझाद मैदानावर एकत्र येत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून यावेळी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत. हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आल्याने मराठा समाजातून जल्लोष करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतलेल्या या भूमिकेला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. त्यातच आता मराठा समाज उपसमितीमध्ये असलेल्या मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठे विधान केले आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी केलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ते प्रयत्न करीत होते. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने दुसरीकडे मात्र ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको तर स्वतंत्र्य आरक्षण द्या, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे.

Shivendraraje Bhosale
Manoj Jarange Patil On Dhananjay Munde News : 'धनंजय मुंडेंनी मजा करावी, राजकारण करावं, पण मराठ्यांच्या नादाला लागू नये'!

या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे मराठा समाजाचे देखील नेते आहेत, मी मराठा समाज उपसमितीमध्ये होतो अनेक बैठका झाल्या, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी कधीही सांगितले नाही की, ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाजाला द्या, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यामुळे वंचित घटकाला न्याय मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Shivendraraje Bhosale
Devendra Fadnavis Politics : ठाण्यात 'देवाभाऊ'ची बॅनरबाजी, मराठा आरक्षणावर श्रेयवादाची लढाई? फडणवीसांच्या आमदाराचा स्पष्ट संदेश

प्रत्येक गोष्टीची जाण असणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. आजपर्यंत ओबीसी आणि मराठा समाजाला वापरण्याचे काम काँग्रेसने केले तर या दोन्ही समाजाला न्याय देण्याचे काम भाजपने केले असे यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

Shivendraraje Bhosale
Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील पुन्हा शिवनेरीवर नतमस्तक होणार! उद्या रुग्णालयातून सुट्टी, पुढचा प्लॅनही सांगितला..

दरम्यान, भाजपकडून राज्यभरात देवाभाऊ कॅम्पेन राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रात जाहिरात देऊन आणि मुंबईत काही ठिकाणी बॅनर लावून देवाभाऊ कॅम्पेन राबविण्यात आले. त्यामुळे या कॅम्पेनवरून आता सर्वत्र चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे महायुतीमधील मित्रपक्षात मात्र मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ सुरु आहे.

Shivendraraje Bhosale
Devendra Fadnavis : "इंग्रजांनी जे केलं ते आम्ही करणार नाही", ओबीसींना फडणवीसांचा मोठा शब्द

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com