Shivsena RajyaSabha : राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचा पत्ता कट, नीलमताईंचाही नकार : एकनाथ शिंदे आता भाजपच्या ताकदीला थोपणाऱ्या चेहऱ्याच्या शोधात?

Eknath Shinde strategy : राज्यसभेसाठी शिवसेनेत नव्या चेहऱ्याच्या शोधाला वेग आला आहे. राहुल शेवाळे आणि नीलम गोऱ्हे यांची शक्यता कमी झाल्याने अंतिम निर्णय एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीवर अवलंबून आहे.
Eknath Shinde reviews potential candidates for Maharashtra Rajya Sabha seat amid speculation over Rahul Shewale and Neelam Gorhe.
Eknath Shinde reviews potential candidates for Maharashtra Rajya Sabha seat amid speculation over Rahul Shewale and Neelam Gorhe.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार विचार केल्यास रिक्त होणाऱ्या 7 जागांपैकी भाजपला 4 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी 1जागा येणार आहे. यात भाजपकडून उमेदवारांच्या नावावर अद्याप चर्चा सुरु आहे, तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जाते. शिवसेनेकडून कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते याची चर्चा आता सुरु झाली आहे.

शिवसेनेला मिळणाऱ्या एका जागेसाठी माजी खासदार राहुल शेवाळे हे उत्सुक आहेत. संसदीय कामाचा अनुभव असलेले, मुंबईत वाढलेले आणि दलित समाजाचा चेहरा यामध्ये शेवाळे फिट बसतात. परंतु नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिकेत चमकदार कामगिरी दाखवू न शकल्यामुळे शेवाळे यांच्यावर उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे दलित, आदिवासी चेहरा किंवा महिलेला उमेदवारी दिली जावी असा सूर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहे. यामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांना प्रारंभी विचारणा झाली होती. मात्र त्यांनी दिल्लीच्या राजकारणात जाण्यात आपल्याला रस नसल्याचे पक्ष नेतृत्वाला सांगितले. त्यामुळे शिवसेना पक्षाकडून कोणत्या चेहऱ्याला संधी मिळणार यावर खल सुरु आहे.

Eknath Shinde reviews potential candidates for Maharashtra Rajya Sabha seat amid speculation over Rahul Shewale and Neelam Gorhe.
BJP Rajya Sabha Candidates : महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री राज्यसभेवर जाणार! भाजपच्या राहिलेल्या 3 जागांसाठी तावडेंसह दानवे, मुंडे, पाटील यांची नावे चर्चेत

मुंबई बाहेरचा उमेदवार देणार?

यापूर्वी शिवसेनेने मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर संधी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई बाहेरचा उमेदवार राज्यसभेसाठी देण्यावर चर्चा सुरू आहे. भाजपची ताकद वाढत असलेल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील हा उमेदवार असावा असा सूर आहे.

Eknath Shinde reviews potential candidates for Maharashtra Rajya Sabha seat amid speculation over Rahul Shewale and Neelam Gorhe.
Rajyasabha Election : पंकजा मुंडेंना पर्याय तयार करण्याचा भाजपाचा डाव फसला; संधी मिळालेले भागवत कराड अन् रमेश कराड ठरले फेल!

यामुळे कोकण, उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील एखाद्या नेत्याचे नाव ऐनवेळी पुढे येऊ शकते. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात असून पुढील काही दिवसांत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com