Priyanka Chaturvedi News : उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रियांका चतुर्वेदींची भूमिका, महिला आरक्षण बिल नामंजूर होताच म्हणाल्या, 'मी...'

Priyanka Chaturvedi Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभेत महिला आरक्षण बीलाच्या विरोधात भूमिका घेतली होती. या बीलाच्या विरोधात त्यांनी मतदान केले. मात्र, प्रियांका चतुर्वेदींनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
Priyanka Chaturvedi
Priyanka ChaturvediSarkarnama
Published on
Updated on

Priyanka Chaturvedi News : लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल मंजूर होऊ शकले नाही. लोकसभेत 528 सदस्य असताना झालेल्या मतदानात बिलाच्या समर्थनार्थ 298 तर विरोधात 230 मतं पडली. या बिलासाठी घटनादुरुस्तीसाठी 352 मतांची आवश्यकता होती. त्यामुळे हे बिलं नामंजूर झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या बिलीच्या विरोधात भूमिका घेतली होती. लोकसभेत पक्षाच्या खासदारांनी विरोधात मतदान केले. मात्र, पक्षाच्या लोकसभेतील या भूमिकेपक्षा प्रियांका चतुर्वेदी यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे.

बील नामंजूर झाल्यानंतर चतुर्वेदी यांनी ट्विट करत म्हटले की, 'भारतातील त्या महिलांसाठी आज दु:खाचा दिवस आहे ज्या संसद किंवा विधानसभेत आपली जागा असले, अशी आशा ठेवत होत्या.

महिलांच्या हक्कांबाबत माझी एक भूमिका आहे, ती नेहमीच राहिली आहे आणि मी ती व्यक्त करत राहीन, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

बिल मतदानाला येण्यापूर्वी त्यांनी भाजपवर टीक केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, '2023 मध्ये सगळ्या पक्षांनी नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठींबा दिला होता. तेव्हा आम्ही (ठाकरेंची शिवसेना) भूमिका घेतली होती की याच्यासाठी प्रतीक्षा नको लगेच अंमलबजावणी करा.'

Priyanka Chaturvedi
Modi Government Bill: संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींनी पंतप्रधानांना डिवचलं; म्हणाले,'मोदीजी का चेहरा देखा आपने?'

प्रियांका चतुर्वेदी नाराज?

राज्यसभा निवडणुकीत प्रियांका चतुर्वेदी यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, ही जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आली. शरद पवार स्वतः उमेदवार होते. त्यामुळे प्रियांका चतुर्वेदी यांची राज्यसभेवर जाण्याची संधी हुकली. चतुर्वेदी यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी या विषयी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केली होती.

Priyanka Chaturvedi
Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या टोमण्यामुळे सत्ताधारी-विरोधक खळखळून हसले; म्हणाले,'माझ्या अन् पंतप्रधान मोदींच्या आयुष्यात पत्नीची...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com