Shivsena UBT Politics : ठाकरेंना धक्का? नाराज माजी महिला खासदाराचा भाजपला मिस्ड कॉल? नव्या समिकरणांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Thackeray Shivsena UBT former MP Priyanka Chaturvedi : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांना फोडण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून करण्यात येत असल्याची चर्चा होत असतानाच काही माजी खासदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही आता समोर येत आहे.
Shivsena Politics; Uddhav Thackeray
Shivsena Politics; Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपच्या नारीशक्ती वंदन मोहिमेला समर्थन दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

  2. याआधी ठाकरे गटाच्या बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त करत वाद निर्माण केला होता.

  3. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेत अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Thackeray Shivsena UBT politics : राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांना फोडण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केले जात आहेत. अशातच ठाकरेंच्या माजी महिला खासदार देखील शिवसेनेवर नाराज असून त्या भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान नुकताच त्यांनी भाजपच्या उपक्रमाचे कौतुक केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुसाट असतानाच ठाकरे गटाच्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी, ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर खासदारांची बैठक घेतली. याच बैठकीमध्ये प्रियांका चतुर्वेदी यांनी खडाजंगी केली होती.

यावेळी प्रियांका चतुर्वेदींनी राज्यसभेची शिवसेनेची हक्काची जागा शरद पवारांना सोडल्याने आपली नाराजी बोलून दाखवली होती. तसेच खासदार संजय राऊत यांच्यावरही नाराजी व्यक्त करत बैठकीतून उठून गेल्या होत्या. यामुळे प्रियांका चतुर्वेदी भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

Shivsena Politics; Uddhav Thackeray
Shivsena UBT Politics : राजकीय वर्तुळात खळबळ! उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराला पोलिसांची नोटिस; नेमकं कारण काय?

दरम्यान आता प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपच्या उपक्रमाला 'मिस्ड कॉल' देत पाठिंबा दिला आहे. तसेच या उपक्रमाचे कौतुक केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नारीशक्ती वंदन अधिनियमाचे जनसमर्थन वाढविण्यासाठी भाजपने मोहिम सुरू केली आहे. याच मोहिमेला चतुर्वेदींनी मिस्ड कॉल देत पुन्हा एकदा आपली महाविकास आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे.

चतुर्वेदींनी मिस्ड कॉल देत पाठिंबा देताच भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी चतुर्वेदींचे निवासस्थानी जावून त्यांचे आभार मानले आहेत. याची माहिती स्वतः चित्रा वाघ यांनीच दिली आहे. त्यांनी, प्रियांका चतुर्वेदी यांची सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाला मिस्ड कॉल देऊन राजकारणापलीकडे जाऊन महिलांच्या हक्कांसाठी उभे राहणे हीच नारीशक्ती, असल्याचे वाघ यांनी म्हटले आहे.

एकीकडे नाराज झालेल्या चतुर्वेदी भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या असतानाच त्यांनी भाजपला मिस्ड कॉल दिल्याने त्यांच्या हातात लवकरच कमळ दिसेल असे बोलले जात आहे. पण राज्यातील भाजपच्या सर्वोच्च नेत्यांकडून अद्याप याबाबत 'ग्रीन सिग्नल' मिळाला नसून त्यांचा प्रवेश होणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Shivsena Politics; Uddhav Thackeray
Shivsena UBT Politics: एक हाती सत्ता काबीज करणाऱ्या भाजपला ठाकरेंचा शिलेदार घाम फोडणार, सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास शिवसेनेनं लावली फिल्डिंग!

FAQs :

1. प्रियांका चतुर्वेदी चर्चेत का आल्या आहेत?
भाजपच्या मोहिमेला समर्थन दिल्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

2. कोणत्या मोहिमेला त्यांनी समर्थन दिले?
नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या जनसमर्थन मोहिमेला त्यांनी मिस्ड कॉल देत समर्थन दिले.

3. याआधी काय घडले होते?
ठाकरे गटाच्या बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त करत वाद निर्माण केला होता.

4. त्यांच्या या कृतीचा काय अर्थ लावला जातोय?
त्या भाजपकडे झुकत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

5. याचा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
शिवसेनेत अंतर्गत मतभेद वाढू शकतात आणि राजकीय समीकरणे बदलू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com