

SIR Supreme Court case : इंडिया आघाडीने एसआयआर, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने रॅलीदरम्यान, केलेल्या टिप्पणींची गंभीर दखल घेतली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयाचा फौजदारी अवमान केल्याबद्दल कारवाई सुरू करण्यास अॅटर्नी जनरल यांनी संमती दिली आहे. या कायदेशीर प्रक्रियेवर बोलताना, संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाची 'माफी मांगता हूं', असे म्हटले आहे.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "सर्वोच्च न्यायालय ही देशाची सर्वोच्च न्यायिक संस्था आहे. जेव्हा न्यायासाठी सर्व दरवाजे बंद होतात, म्हणजे निवडणूक आयोग, राज्यपाल किंवा अन्य न्याय देणाऱ्या संस्था आहेत. शेवटी न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर जातो. न्याय मागतो. एसआयआर, तसेच केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जी गडबड केली आहे, त्यावरून संपूर्ण देशात असंतोष आहे. देश जळतो आहे. या सर्वाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आम्ही, इंडिया आघाडीच्यावतीने याचिका दाखल केली आहे."
सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) वाटत असेल, तर माझ्याकडून काही चूक झाली आहे, तसा चूक पकडण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाविरोधात मानहानीकारक विधान केले आहे, त्याला विचारणा करू शकते. माझ्या विधानांविषयी अशी काही सर्वोच्च न्यायालयाच्या हरकती असतील, तर मला जरा पण वाईट वाटत नाही की, मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागावी आणि माफी मागत आहे.
पण आम्हाला न्याय पाहिजे. देशाला न्याय पाहिजे. एसआयआरच्या नावाखाली निवडणूक आयोगाने ज्या 12 ते 13 कोटी लोकांचे नाव मतदार यादीतून डिलिट केले गेले आहेत. त्यांना न्याय हवा. शिवसेना पक्षात जशी फुट पाडली आहे. ज्या व्यक्तीला आमच्या पक्षाचे चिन्हं दिले आहे, त्याचा कोणताही संबंध नाही. चार वर्षांपासून आम्ही न्याय मागतो आहे, तिथे देखील न्याय झाला पाहिजे. मनात चिड तयार झाली आहेत. यातून काही चुकीचे विधाने निघत असतील, माझ्याकडून किंवा आमच्या याचिकाकर्त्यांनीकडून अशी विधाने निघत असतील, तर मी दहा वेळा सर्वोच्च न्यायालयाची माफी मागेल. पण देशातील लोकशाही वाचवण्याची जबाबदारी देखील सर्वोच्च न्यायालयाची आहे. त्यासाठी आम्ही न्याय मागत राहू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाबाबत चुकीचे विधान व्हायला नाही पाहिजेत. परंतु देशाची परिस्थिती पाहिल्यास, सगळीकडे अस्थिरता पसरलेली आहे. ती थांबवण्याची ताकद सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीस सूर्य कांत यांनी म्हटले आहे की, आम्ही दबावात राहणार नाही. आम्हाला देखील तेच हवे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह ज्यापद्धतीने भाषा वापरत आहे, राजकारण करत आहे. खासदार, पक्ष फोडत आहे. कोणालाही कोणत्याही पक्षाचे मालक करत आहेत. संविधानावर हल्ले करत आहे. संविधानाचे उद्या मालक होण्याचा प्रयत्न करतील. संवैधानिक संस्थाचे मालक झालो आहोत, हे दाखवले जात आहे. यातून आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधशींसमोर कायम हात जोडून उभे आहोत. आम्ही तुमच्याकडून अपेक्षा नाही करायची मग कोणाकडून करायची? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या दरवाज्यावर का गेलो होतो, ते यासाठी गेलो होतो. न्यायालयाचा अवमानाचा संदर्भात बोलताना, ही कायदेशीर लढाई आहे. पण मी कधीही न्यायालयाचा अवमान करू शकत नाही. रागाच्या भरात बोलून जातो. देशाचा राग आहे. सर्वसामान्य नागरीक आहे. बोलून जातो व्यक्ती. अंकिता भंडारी हित्या हत्येतील, संशयिताला राज्यपाल बनवले गेले. त्याकडे कोणी का बघत नाही? त्याबाबत क्रिमिनल पिटीशन का दाखल होत नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.