Farmer sends rs51 money order : दुष्काळी मदत 5 हजारांची; शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवले 51 रुपये! अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं?

Ahilyanagar farmer sends 51 money order CM Devendra Fadnavis 5000 Diwali aid, while drought-hit farmers protest Pathardi demanding relief, fodder and water : कपाशीचे नुकसान, पीकविम्याची प्रतीक्षा आणि मदतीबाबतची नाराजी; शेवगावमध्ये निषेध, तर पाथर्डीत शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'.
Farmer sends rs51 money order
Farmer sends rs51 money orderSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यातील महायुती सरकारने दिवाळीसाठी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर केली असून, त्या मदतीवरून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील शेतकरी मधुकर पाटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 51 रुपयांची 'मनी ऑर्डर' पाठवून त्यातून कुटुंबीयांचीावल दिवाळी करा, असे खोचक टोला लगावला आहे.

शेवगावच्या बालमटाकळी येथील शेतकरी (Farmer) मधुकर पाटेकर यांनी 3 हेक्टर 70 गुंठ्यांमध्ये कपाशीची लागवड केली होती. त्यासाठी दीड लाख रुपयांचा खर्च केला. मात्र पावसाअभावी बहुतांश पीक जळून गेले. गेल्या वर्षी त्यांनी कापसाचा पीकविमासाठी 7 हजार 300 विमा भरला होता. यंदा 6 हजार 200 रुपये पीक विम्याचे भरले. मात्र गेल्यावर्षी पीक विमा अद्याप मिळालेला नाही. अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करायची? असा प्रश्न केला आहे.

यातच राज्य सरकारने (Government) केवळ पाच हजार रुपये देत दिवाळी साजरी करण्यास सांगितले. ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे, असे म्हणत मधुकर पाटेकर यांनी नाराजी व्यक्त केली. यातून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना 51 रुपयांची 'मनी ऑर्डर' पाठवली. बालमटाकळी येथील टपाल कार्यालयात जाऊन 'मनी ऑर्डर' पाठवल्याचे शेतकरी पाटेकर यांनी सांगितले.

Farmer sends rs51 money order
Sanjay Raut Supreme Court : संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण

दरम्यान, पाथर्डी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बैल गाड्या, जनावरांसह शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या शेतकरी आणि पशुधनाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. जनावरांसाठी चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

Farmer sends rs51 money order
Sanjay Raut Supreme Court : संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण

शेतकर्‍यांचा 'रास्ता रोको'

पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, पिकांचे नुकसान आणि चारा-पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांसमोर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याबरोबरच जनावरांना जगविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून ठोस उपाययोजना होण्याऐवजी केवळ पंचनामे केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

चारा अन् पाण्याचा प्रश्न गंभीर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विकास वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बाळासाहेब गर्जे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. पाथर्डी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दिग्विजय पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलकांच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्या. चारा आणि पाण्याच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विकास वाघ, बाळासाहेब गर्जे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com