Buldhana political controversy: ‘बुलढाण्याचा बिहार झालेला आहे, पुन्हा शांत करायचाय’; श्वेता महालेंचा गंभीर आरोप, संजय गायकवाडांना थेट ललकारलं

Shweta Mahale latest statement News : चिखली मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले व बुलढाणा मतदारसंघाचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष हा जग जाहीर आहे.
Sanjay Gaikwad, shweta mahale
Sanjay Gaikwad, shweta mahale Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Buldhana News : राज्यभरात भीषण असा दुष्काळ पडला असतानाही बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि बुलढाणा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा संघर्ष मात्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. चिखली मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले व बुलढाणा मतदारसंघाचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष हा जग जाहीर आहे. एकमेकांच्या मतदारसंघात कार्यक्रम आयोजित करण्यापासून एकमेकांवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यापर्यंत हा संघर्ष दिसून येत आहे.

श्वेता महाले यांनी बुलढाणा मतदारसंघातील हातडी ते पांगरी हा रस्ता गावकऱ्यांना बनवून दिला. यानिमित्त हातडी गावातील नागरिकांनी आमदार श्वेता महाले यांचा सत्कार केला. या सत्कार कार्यक्रमात आमदार श्वेता महाले यांनी पुन्हा एकदा शिंदेंचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना डिवचले आहे.

आमदार श्वेता महाले म्हणाल्या, 'बुलढाण्याचा बिहार झालेला आहे व आपल्याला पुन्हा बिहारचा आपला शांत बुलढाणा करायचा आहे. यापुढे बुलढाणा मतदारसंघात कुठेही हुकूमशाही चालणार नाही. त्याशिवाय आजचा सत्कार कार्यक्रम आयोजित करणाऱ्या विजू भाऊंच्या पत्नीला उचलून नेण्याची व गायब करण्याची सुद्धा भाषा करण्यात आली, असा गंभीर आरोप श्वेता महाले यांनी केला.

Sanjay Gaikwad, shweta mahale
Sanjay Gaikwad News: ‘राजकारणातला बाप कोण हे योग्यवेळी दाखवून देऊ’; धनुष्यबाणाच्या इशाऱ्यावर संजय गायकवाडांचा श्वेता महालेंवर थेट पलटवार

बुलढाणा मतदारसंघात बांधकाम कामगारांकडून सुरक्षा किटसाठी दोन हजार रुपयांची मागणी केली जात आहे, असा गंभीर आरोप श्वेता महाले यांनी केला आहे. जे समजदार आहेत ज्यांचा मेंदू जागेवर आहे, त्यांनी आता समजून घ्यायला पाहिजे, असा इशाराही आमदार महाले यांनी अप्रत्यक्षरीत्या संजय गायकवाड यांना दिला.

Sanjay Gaikwad, shweta mahale
'खरा बाप कोण हे जनतेने दाखवले'; शिवसेनेच्या आमदाराचे नाव न घेता श्वेता महालेंचा टोला

त्याशिवाय आमच्या चिखली मतदारसंघातही एक नटरंग आहे. असा टोलाही त्यांनी नाव न घेता काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांना लगावला. श्वेता महाले यांनी आक्रमक शैलीत आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे आता यावर आमदार संजय गायकवाड काय प्रतिक्रिया देतात हे बघणे महत्त्वाचे असेल मात्र सध्या तरी हा संघर्ष थांबताना दिसत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com