Sonia Gandhi : सोनिया गांधींच्या पहिल्या मुलाचा मृत्यू, अंत्यविधीवरून संभ्रम..., भावूक अनुभव सांगितला

Sonia Gandhi Book Belonging : सोनिया गांधींनी त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकात त्यांच्या पहिल्या मुलाच्या निधनाबद्दल आणि त्यांच्या अंत्यसंस्कावरून झालेल्या संभ्रमाबाबत भावूक अनुभव सांगितला आहे.
Sonia Gandhi
Sonia Gandhi Book Belongingsarkarnama
Published on: 
Updated on: 

Sonia Gandhi News : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींचे 'बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह' हे पुस्तक सध्या चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहे. अवघ्या दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाने सोनिया गांधी, राजीव गांधी यांच्या आयुष्यातील माहिती नसलेले अनेक पैलू समोर आणले आहे. आपल्या पहिल्या मुलाला गमवण्याचा आणि त्याच्या अंत्यविधीवरून संभ्रमाने भावूक अनुभव सोनियांनी या पुस्तकात दिला आहे.

राहुल यांच्या आधी सोनियांनी 19 जानेवारी 1969 मध्ये एका मुलाला जन्म दिला होता. मात्र, बाळ प्रीमेच्योर होते. त्यामुळे त्याला वाचवता आले नाही. नवजात बाळाच्या अंत्यविधीसंदर्भात राजीव गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

राजीव यांनी सोनियांना विचारले की आता काय करायला हवे , हिंदू परंपरेनुसार नवजात बाळाचे अंत्यसंस्कार केला जात नाही. त्याच्या शरीराला नदीमध्ये प्रवाहित केले जाते. त्याला दफन केले जात नाही. ख्रिश्चन दफनभूमीतही नाही; कारण तसे केल्यास मोठा वाद निर्माण झाला असता. जवळच असलेल्या पारशी दफनभूमीतही त्याला पुरता येणार नव्हते. राजीवचे वडील पारशी होते, पण त्यांनी त्या धर्मातील प्रथा पाळल्या नव्हत्या,असा अनुभव सोनियांनी पुस्तकार लिहिला आहे.

Sonia Gandhi
सोनिया गांधींच्या आयुष्यातील खास क्षण; पहिल्यांदाच समोर आले दुर्मिळ फोटो

शेतात अंत्यसंस्कार...

सोनिया गांधी उल्लेख करतात की रुग्णालयात त्या खूप खिन्न झाल्या होत्या, थकलेल्या होत्या. मात्र, राजीव गांधींनी त्यांना हळूच हलवले आणि प्रेमाने म्हटले, सोनिया, आपण दोघांनी मिळून यावर निर्णय घेतलाच पाहिजे. मात्र, बाळाचा मृतदेह नदीत फेकून देण्याची परवानगी मी देणार नाही, असे मी कुजबुजले.

त्या वेदनादायी परिस्थितीत बाळाला दफन करणे हा अत्यंत दुःखद आणि मनाला यातना देणारा पर्याय होता. मात्र, आमच्यासमोर दुसरा कोणताही मार्ग नव्हता. अखेर बाळाला मेहरौली येथील त्यांच्या वडिलोपार्जित शेतातील एका भींतीपासून काही अंतरावर दफन केले.

Sonia Gandhi
Sonia Gandhi memoir : सोनिया गांधींच्या आत्मचरित्राने राजकीय वर्तुळात खळबळ; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितली राजीव गांधींच्या आठवणींची गोष्ट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.