Sunetra Pawar Emotiona : अजिदादांच्या अपघाताला दोन महिने, सुनेत्रा पवारांची भावूक पोस्ट; 'मन अजुनही...'

Ajit Pawar Accident Two Months Sunetra Pawar : अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज दोन महिने पूर्ण झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट भावूक पोस्ट केली आहे.
 Ajit Pawar, Sunetra Pawar
Ajit Pawar, Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये दुर्देवी निधन झाले. आज त्यांच्या निधनाला दोन महिने पूर्ण होत आहेत. त्या निमित्त त्यांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट केली आहे.

त्या म्हणाल्या, 'आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते.'

'तुमच्यातील लोकाभिमुख - विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली.', असे देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोकळी भरून निघणार नाही

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल तुमच्या प्रेरणेनेच अखंड सुरू आहे. लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केले असते, हा विचार मनात ठेवून मी प्रत्येक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते. तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते, असा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

 Ajit Pawar, Sunetra Pawar
Jitendra Awhad : दादा माफ करा...काही चुकलं असेल; जितेंद्र आव्हाड यांनी भर विधानसभेत हात जोडले

...तुम्ही दिलेली मूल्ये हीच प्रेरणा

तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते. पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे विचार आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आठवण मनात कायमची कोरलेली आहे. तुमच्या शब्दांमधील ताकद मला उभे राहण्याची ऊर्जा देते.

दादा, तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य आहे. पण तुमची स्वप्ने, तुमचे कार्य आणि तुमचे विचार पुढे नेण्याचा निर्धार मी कायम मनाशी जपेन. तुम्ही दाखवलेली दिशा आणि दिलेली मूल्ये हीच आमची प्रेरणा आणि मार्गदर्शक राहतील.

 Ajit Pawar, Sunetra Pawar
Uddhav Thackeray On Ajit Pawar : शिवसेनाप्रमुखांची स्टाईल, अजितदादांची चाल! सर्व गोष्टी काटकोनात! उद्धव ठाकरेंनी रंगवली जुनी आठवण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com