Ajit Pawar Condolence Motion
Ajit Pawar Condolence MotionSarkarnama

Uddhav Thackeray On Ajit Pawar : शिवसेनाप्रमुखांची स्टाईल, अजितदादांची चाल! सर्व गोष्टी काटकोनात! उद्धव ठाकरेंनी रंगवली जुनी आठवण

Uddhav Thackeray Recalls Balasaheb Thackeray During Ajit Pawar Condolence Motion : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी अजितदादांना शिवसेनाप्रमुखांसारखी सवय होती, याची आठवण सांगितली.
Published on

Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर शोकप्रस्ताव सादर करण्यात आला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ज्या सदस्यांचं निधन झालं आहे त्यांच्याबाबत दोन्ही सभागृहांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांनी भाष्य केलं.

विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्याविषयी भाष्य करताना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 'ती' सवय अजितदादांना होती, याची आठवण सांगितली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "अजितदादांसमोर अधिकारीही वचकून असायचे. अनेकदा कळायचे नाही की, ते कौतुक करायचे की, दम देतात. पण त्यांची शैली होती. अनेकदा त्यांच्या विधानाने ते अडचणीत आले. पण ते बिनधास्त बोलायचे. बेधडक काम करायचे. कारण त्यांच्या मनात पाप नसायचे."

'अडचणीच्या वेळी त्यांनी राज्याचं अर्थ खातं सांभाळलं. मला कशाचा अनुभव नसताना त्यांनी भरोसेमंद सहकारी म्हणून काम केलं. घड्याळ (NCP) आणि वेळ… म्हणूनच अजितदादांची ती निशाणी होती की काय! अजितदादा वेळेत यायचे. विषय घेऊन यायचे. काम झालं की लगेच निघायचे. अजितदादांचं टेबल, सर्व गोष्टी काटकोनात असायचे. ही सवय शिवसेनाप्रमुखांनाही होती,' अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली.

Ajit Pawar Condolence Motion
Eknath Shinde on Maoist surrender : माओवादी देवजीची शरणागती; शिंदेंचा शाहांना सलाम, ‘निर्धाराचं फळ मिळालं!’

दोन सकाळ; आश्चर्य अन् धक्का...

'माणसं येतात, माणसं जातात, अनेकजण अशी असतात, ती गेल्यावर कळतात. काहीजण जवळ असले तर, कळत नाहीत. पण गेल्यावर कळतात. माझ्या कारकीर्दची सुरवात ही वेगळी होती. आम्ही कधी एकत्र येऊ असं वाटलं नाही. दोन सकाळ अशा होत्या की एक सकाळ आश्चर्य देणारी होती. दुसरी सकाळ सर्वांना धक्का देणारी होती,' अशीही देखील आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.

Ajit Pawar Condolence Motion
Elon Musk tax claim : जगातील श्रीमंतांचा बादशाह म्हणतोय, 500 अब्ज डॉलर टॅक्स भरेन! Elon Musk यांच्या संपत्तीचा चक्रावणारा आकडा समोर

मोठ्या वृक्षाच्या सावलीत स्वतः च अस्तित्व...

'मी त्यांच्यासोबत आलो तेव्हा ते सहकारी म्हणून आले. अजितदादा उपमुख्यमंत्री होते. आता कामकाजात जाणवतं की, अजितदादा यांच्यासारखा भरसोमंद मित्र, दिलदार मित्र, मी गमावला आहे. कोणतीही गोष्ट कळली नाही तर, अजितदादा यांच्याशी बोलायचो. त्यांच वैशिष्ट्य म्हणजे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. एका मोठ्या वृक्षाच्या सावलीच्या सोबत एक स्वतः च अस्तित्व निर्माण केलं होतं,' असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

बारामती पोरकी झाली

"मी मुख्यमंत्री असताना दोन वेळा बारामतीला गेलो होतो. मुख्यमंत्री असताना माझ्या आजारावर बोललं जात होतं. त्यावेळी मला बारामतीचं सर्वकाही सांगत होते. त्यानंतर त्या रात्री मी बारामतीला गेलो, तेव्हा ती बारामती पोरकी झालेली पाहिली," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com