DCM Sunetra Pawar: सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्यानंतर काही मिनिटांतच PM मोदींचं ट्विट, म्हणाले....

PM Narendra Modi On Sunetra Pawar: अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा नवा गटनेता, नवे उपमुख्यमंत्री कोण असणार यांसारखे प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात होते. अखेर या प्रश्नाची उत्तरं आता मिळाली आहे.
PM Narendra Modi On Sunetra Pawar .jpg
PM Narendra Modi On Sunetra Pawar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातात यांचं निधन झालं. दरम्यान, अजितदादांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीचा नवा गटनेता, नवे उपमुख्यमंत्री कोण याबाबत विविध चर्चांना उधाण आलं होतं. पण आता सुनेत्रा पवारांनी अखेर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनामध्ये पार पडलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. हा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर काही मिनिटांतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्विट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.31) ट्विट केलं आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यावेळी पीएम मोदींनी मला विश्वास आहे की, त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या 17 व्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सायंकाळी 5 वाजता त्यांचा शपथविधी पार पडला आहे. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, सर्व आमदार उपस्थित होते.

सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाची महत्त्वाची बैठक शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बोलावण्यात आली होती. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने सर्वप्रथम पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.

PM Narendra Modi On Sunetra Pawar .jpg
Jayant Patil News: 'अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, तर...'; जयंत पाटलांनी इतकी वर्षे मनात जपून ठेवलेली गोष्ट पहिल्यांदाच उघडपणे सांगितली

सुनेत्रा पवार यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती. मात्र आता सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असल्याने त्यांना खासदारकी सोडावी लागणार होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.

अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा नवा गटनेता, नवे उपमुख्यमंत्री कोण असणार यांसारखे प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात होते. अखेर या प्रश्नाची उत्तरं आता मिळाली आहे.

PM Narendra Modi On Sunetra Pawar .jpg
Rohit Pawar News: सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदासाठी जोरदार हालचाली; रोहित पवारांचं सूचक ट्विट, काय म्हणाले...?

मुंबईमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन प्रस्ताव मांडण्यात आले, पहिला प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवडी संदर्भात होता. तर सुनेत्रा पवारांना पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचा संविधानिक अधिकार मिळण्यासंदर्भातचा दुसरा प्रस्ताव होता. हे दोन्हीही प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com