NCP MLA Split : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचे 20 आमदार फुटणार, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Sunetra Pawar NCP: अजित पवारांचे नेतृत्व राहिलेले नाही. त्यांना स्वाभिमान गहाण ठेवावा लागतोय. अशा वेळी ते आमदार स्वगृही परततील किंवा इतर एक दोन पक्षात जातील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Nashik ZP Elections | Sunetra Pawar | BJP vs NCP
Nashik ZP Elections | Sunetra Pawar | BJP vs NCPSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sanjay Raut News : शरद पवारांची राष्ट्रवादी आणि सुनेत्रा पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीचे विलीनीकरणाविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांच्या दरम्यानच ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सुनेत्रा पवारांचे 20 ते 22 आमदार फुटणार असल्याचा दावा केला आहे.

राऊत म्हणाले की, मी इतकेच सांगेल की सुनेत्रा पवार यांचा पक्षातील 20 ते 22 आमदार कधीही बाहेर पडतील. ते बाहेर पडण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. आणि माननीय शरद पवारसाहेबांना ते भेटतायते ते गप्पा मारण्यासाठी नाही.

अजित पवारांचे नेतृत्व राहिले नाही, एकप्रकारे त्यांना गुलामी करावी लागतेय. स्वाभिमान गहाण ठेवावा लागतोय. अशा वेळी ते स्वगृही परतील. त्याला विलीनीकरण म्हणत नाहीत. किंवा ते निवडणुकीच्याआधी एक दोन पक्षांमध्ये प्रवेश करतील, असे देखील त्यांनी केला.

पुढे बोलताना त्यांनी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली असलेली राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी नाही. तो अमित शाहांचा पक्ष आहे. आणि तो फुटेल असा दावा केला.

सुनेत्रा पवारांची आज पत्रकार परिषद

राष्ट्रवादीच्या विलीनीकरण होणार नसल्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे. दरम्यान, आज बारामती सुनेत्रा पवार यांची पत्रकारा परिषद होणार आहे. ते या पत्रकार परिषदेमध्ये नेमके विलीनीकरणाविषयी काय बोलणार याची उत्सुकता असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.