Sunil Tatkare Setback : सुनील तटकरेंना मोठा धक्का, कट्टर विरोधकांकडून राष्ट्रवादीला खिंडार, राष्ट्रवादीचे शिलेदारांच्या हाती 'धनुष्यबाण'

Sunil Tatkare Shiv Sena : आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.माणगावमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
NCP Workers Switch Sides, Sunil Tatkare Faces Political Setback
NCP Workers Switch Sides, Sunil Tatkare Faces Political Setbacksarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena News : रायगड जिल्ह्यामध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे सर्व आमदार एकवटले आहेत. कट्टर विरोधत मंत्री भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांनी यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडले आहेत. तटकरेंच्या खंद्या समर्थकांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे.

माणगाव नगरपंचायतीमधील सुनील तटकरे यांचे समर्थकांसह राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.

माजी नगरसेवक संदिप खरगटे, दिलीप जाधव, जयंत बोरडे, रत्नाकर उभारे , भाग्यश्री यादव, माजी उपनगराध्यक्ष निलिमा मेहता यांनी मंत्री भरत गोगावले , आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतले.

आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातो आहे. दरम्यान, पक्षप्रवेशावेळी माणगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा संकल्प करण्यात आला.

NCP Workers Switch Sides, Sunil Tatkare Faces Political Setback
Shiv Sena controversy : शिंदेच्या खाजगी सचिवांविरोधातच महिला पदाधिकाऱ्याची पोलिसांत धाव; शिवसेनेच्या कार्यक्रमात पती-पत्नीला मारहाण केल्याचा आरोप

'ती' ब्याद बाहेर पडणार

आमदार महेंद्र दळवी यांनी पक्षप्रवेश सोहळ्यात सुनीत तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादीची ब्याद राष्ट्रवादीतून बाहेर पडणार आहे. बाहेर पडल्यास सुनील तटकरेंना शिवसेनेत घेऊ नका, असे देखील ते म्हणाले.या पुढे रायगडचा खासदार कोण हे शिवसेना ठरवले, असे जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी म्हटले.

NCP Workers Switch Sides, Sunil Tatkare Faces Political Setback
Ajit Pawar NCP MLAs : शरद पवारांच्या संपर्कात अजितदादांचे 22 ते 26 आमदार? फडणवीस अलर्ट; महायुतीत मोठी खळबळ!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.