

Supriya Sule News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएसोबत जाणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला पक्ष एनडीएसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत आला तर त्यांचा फायदा होईल. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद आणि आणखी एक राज्यमंत्रिपद मिळेल, असे म्हटले आहे. महाराष्ट्रात देखील त्यांच्या वाट्याला दोन ते तीन मंत्रिपदे येतील, असे देकील त्यांनी सांगितले.
आठवले म्हणाले की, ''डिलिमीटेशन बिलाला पाठींबा देण्याची भूमिका शरद पवार यांच्या पक्षाने घेतली आहे. याबद्दल मी पवारसाहेबांचे अभिनंद करतो. बिलाला पाठींबा देण्याचा निर्णयाची घोषणा सुप्रिया सुळेंनी केली आहे. पण मला असं वाटतंय की पवारसाहेबांनी एनडीएसोबत येण्याचा निर्णय घेतला पाहिजे."
पुढे बोलताना ते म्हणाले, 'एनडीएसोबत जाॅर्ज फर्नांडिस, शरद यादव, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, विनायक पटनाईक होते. आपला विचार सोडण्याची आवश्यकता नाही. मी देखील भाजपच्या सगळ्या विचाराशी सहमत आहे असं नाही. पण विकासाच्या अजेंड्यावर एकत्रित आहोत. पवारसाहेबांनी एकत्र यायला हरकत नाही. त्यांचे आठ खासदार आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांना मंत्री बनवण्याची संधी मिळू शकते. एखादे अजून एक राज्यमंत्रिपद मिळू शकते. महाराष्ट्रात सुद्धा त्यांचे दोन तीन मंत्री होऊ शकतात. जर ते एनडीएससोबत आले तर बघुया काय होतं ते.'
हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली नाही. मात्र हिवाळी अधिवेशन होईल किंवा तीन दिवसांचे विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे. यामध्ये डिलिमीटेशन बिल आणि महिला आरक्षण बील पास होईल. संजय राऊत यांनी खासदारांना 150 कोटी देऊन खरेदी करून बील पास करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा देखील आठवले यांनी खोडून काढला. असे कोणालाही पैसे दिलेले नाहीत, डिलिमीटेशन पार्टीचा व्हिप असल्यामुळे काही लोक विरोधात आहेत मात्र या वेळेला हे बील पास होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.