

Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावर सून गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या सुनेने सासरच्या मंडळीने अघोरी प्रकार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राऊत यांच्या कुटुंबावर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. याबाबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी मोठे विधान करीत विरोधकाना चकित केले आहे.
राऊत यांच्या कुटुंबावर गिरीजा राऊत यांनी केलेल्या आरोपांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना या विषयावर फारस बोलणं सुषमा अंधारे यांनी टाळले आहे. यावेळी माध्यमांना बोलताना अंधारे म्हणाल्या, ’मला मोशी डम्पिंग ग्राउंडचा विषय अजिबात डायवर्ट करायचा नाही, त्यावर नंतर संध्याकाळपर्यंत बोलेल.' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर त्यांनी मोठा दावा केला आहे. मी दिल्लीला गेलो होतो, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला फोन करून बोलावले होते. अमित शाह यांनी मला सांगितले होते की भाजप जॉइन करा. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या या दाव्यावर बोलताना अंधारे यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. ते सगळ्यांना बोलावतात, फक्त मला आता ईडीची चौकशी लावता येत नाही म्हणून बोलावले नाही, असे यावेळी अंधारे म्हणाल्या.
गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात राऊत कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आता सुनेच्या आरोपांवर विनायक राऊत यांनी आपली बाजू मांडत गिरीजा राऊत यांनी केलेले सर्व गंभीर आरोप फेटाळले आहेत. यावेळी त्यांनी सुनेने केलेले आरोप खोटे असल्याचे सांगत सुनेबाबतच अनेक धक्कादायक दावे केले आहेत.
माझ्या कुटुंबावर लावलेले आरोप खोटे आहेत. गितेश राऊत यांचे लग्न झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांची पत्नी त्यांच्याबरोबर राहत नाही. तक्रारीत २०१८-२२ पर्यंत अघोरी कृत्य केली जात होती, असे लिहिले आहे. या अघोरी कृत्यावेळी तिचे आई-वडील तिच्याबरोबर होते. मग त्यांनी ताबडतोब तक्रार का केली नाही? त्यांना कोणी अडवले होतं? असे सवाल विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.