Talathi Bharti 2026 : मोठी बातमी! तलाठी भरती जाहीर, तब्बल 5707 जागांसाठी MPSC घेणार परीक्षा

MPSC Talathi Recruitment Exam: 2619 रिक्त पदे भरण्याकरीता 25 जूनला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये बदल करत तलाठी तसेच अन्य रिक्त पदांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
MPSC to conduct Talathi Bharti 2026 examination for 5707 vacancies in Maharashtra Revenue Department.
MPSC to conduct Talathi Bharti 2026 examination for 5707 vacancies in Maharashtra Revenue Department.Sarkarnama
Published on
Updated on

Talathi Vacancy 2026 : एमपीएससी मार्फत आता तलाठी भरती होणार आहे. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६- ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गांसह एकूण 5707 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पदसंख्येतील बदल आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

2619 रिक्त पदे भरण्याकरीता 25 जूनला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये 25 ऑक्टोबरला पूर्व परीक्षा होणार होती. आता या परीक्षेमध्ये 1539 तलाठी पदांसाठी, तर राज्य तक्रार ग्राहक निवारण आयोगाच्या वरिष्ठ अभिलेख, वरिष्ठ लिपीकची 11 पदे यासह लिपीक, महसूल आणि आदिवासी वन विभागाच्या लिपीक टंकलेखकांची रिक्त पदे अशी एकुण 3088 पदांसाठी परीक्षा होणार आहे.

या परीक्षेसाठी 5 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. तर, परीक्षा शुल्क 8 ऑगस्टपर्यंत भरावे लागणार आहे. या भरतीसाठींचा पदानिहाय तपशील पूर्वपरीक्षेच्या आधी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या संवर्गातील किती जागा आहेत ते आरक्षणाचे शुद्धपत्रक जाहीर झाल्यानंतर समजेल.

MPSC to conduct Talathi Bharti 2026 examination for 5707 vacancies in Maharashtra Revenue Department.
MPSC News: 'एमपीएससी'ची परीक्षा ऑनलाईन? मुख्यमंत्र्यांनी संघटनांची मागणी फेटाळली; फडणवीसांनी दिली मोठी अपडेट

पदनाम एकुण पदे

तलाठी 1539

वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल - 11

सहाय्यक मत्यव्यवसाय विकास अधिकारी - 254

लिपीक टंकलेखक - 440

लिपिक टंकलेखक (महसूल-वनविभाग) - 339

MPSC to conduct Talathi Bharti 2026 examination for 5707 vacancies in Maharashtra Revenue Department.
MPSC News : MPSC उमेदवारांना सरकारचा झटका : उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार भरती नियमात मोठे बदल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com