

Mumbai News : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे पहिल्यांदाच आंदोलनात उतरले आहेत. दुसरीकडे माजी मंत्री आदित्य ठाकरे व मनसेचे नेते अमित ठाकरे हे देखील रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी तीन ठाकरे बंधू रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व मनसे सैनिक रस्त्यावर उतरल्याचे पाहवयास मिळाले. यावेळी आक्रमक झालेले कार्यकर्ते पोलिसांना भिडल्याने याठिकाणी जोरदार राडा झाला.
मुंबईत शिवाजी पार्कवर सलग दुसऱ्या दिवशी सीजीपीने आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी रविवारी दुपारपासूनच धरपकड सुरु केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सीजेपीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी पुन्हा धरपकड केली. त्यामुळे शिवसेना (Shivsena) भवनासमोर छावणीचे स्वरूप आले होते.
रविवारी सायंकाळी दादर परिसरात मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह कार्यकर्त रस्त्यावर उतरले. तर त्यानंतर काही वेळातच तेजस ठाकरे पहिल्यांदाच आंदोलनात उतरले. दुसरीकडे माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व मनसेचे नेते अमित ठाकरे हे देखील रस्त्यावर उतरले. यावेळी तीन ठाकरे बंधू रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व मनसे सैनिक रस्त्यावर उतरल्याचे पाहवयास मिळाले.
यावेळी आक्रमक झालेले कार्यकर्ते पोलिसांना भिडल्याने याठिकाणी जोरदार राडा झाला. त्यातच आदित्य ठाकरे यांनी पोलीसाच्या वाहनावर चढून जोरदार घोषणाबाजी केली. तर माजी मंत्री अनिल परब व पोलिसात वाद झाला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. तर याठिकाणी ठाकरे सेना व पोलिसात चांगलीच झटपट झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.