TET Paper Leak : TET पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक माहिती उघड; पहिला पेपर कसा आला बाहेर? कशी झाली पैशांची देवाणघेवाण?

TET exam paper leak scam Maharashtra : टीईटी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. प्रश्नपत्रिका 8 हजारांत मिळवून ती 80 हजारांना विकल्याचा आरोप समोर आला असून, या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे.
TET
TETSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील सुमारे 6 लाखांहून अधिक उमेदवारांच्या भवितव्याशी संबंधित असलेली प्रश्नपत्रिका केवळ 8 हजार रुपयांत छापखान्यातून बाहेर काढण्यात आल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण गैरप्रकाराचा मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून, तपास यंत्रणा त्याचा कसून शोध घेत आहे.

28 जून रोजी पार पडणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तर प्रदेशातील आग्रा येथे असलेल्या ‘महीम पत्रम प्रायव्हेट लिमिटेड’ या छपाई केंद्रात तयार करण्यात आली होती. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, छापखान्यात काम करणाऱ्या नरेशकुमार मौहर उर्फ निकी याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी ओळखून त्याचा फायदा घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

TET
Maharashtra Government Decision : कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वनवास संपला! 10 वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांना सेवेत सामावून घेण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जारी

सुरक्षा तपासणीदरम्यान केवळ कपड्यांची झडती घेतली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने सलग काही दिवस प्रश्नपत्रिकांचे संच बाहेर पोहोचवले. त्यानंतर हे पेपर मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता याच्या नेटवर्कमधील सोनू नावाच्या व्यक्तीकडे पोहोचवण्यात आले. सुरुवातीला अवघ्या 8 हजार रुपयांत विकण्यात आलेली ही प्रश्नपत्रिका पुढे 80 हजार रुपयांपर्यंत विक्रीस गेल्याचे तपासात उघड झाले आहे. यामध्ये विविध दलालांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून प्रश्नपत्रिकेची मूळ प्रतही जप्त केली आहे.

दरम्यान, परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधीच या गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला होता. 26 जून रोजी भिवंडी परिसरात मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचला. भिवंडी परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. त्यानंतर 27 जून रोजी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्या जवळून टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली.

TET
Mumbai Coastal Road : कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला भीषण आग; धुराचे लोट, दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प, थरारक व्हिडिओ समोर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जप्त करण्यात आलेली प्रश्नपत्रिका मूळ असल्याचे स्पष्ट केल्यानंतर तपासाला वेग आला. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता आणि त्याचा सहकारी सोनू अद्याप फरार आहेत. दोघांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com