

Mumbai News : दिल्लीतील सीजेपीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे उद्धव-राज ठाकरे हे बंधू दुसऱ्यांदा एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरेंनी रस्त्यावर उतरत तर राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पाठिंबा दिला होता. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंनी मोर्चाची हाक दिली होती. मात्र, त्याआधीच केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याने ठाकरे बंधूंना मोर्चा मागे घ्यावा लागला. मात्र, रविवारी मुंबईत ठाकरे बंधूनी अभिनंदन मोर्चा काढला. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंच्या या पुढील भूमिकेला ठाकरेंनी आधीच पाठिंबा दिला आहे. ठाकरे बंधूंच्या रविवारच्या तिरंगा विजय जल्लोषात हजारोंच्या संख्येनं तरुणांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे आगामी काळातही ठाकरे नावाची क्रेझ जेन झीमध्ये कायम राहणार का? हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे.
ठाकरे नावाचे आकर्षण आणि दरारा 'जेन झी' (Gen Z) पिढीतही दिसून येत आहे, कारण अलीकडच्या राष्ट्रीय विद्यार्थी आंदोलनांच्या निमित्ताने ठाकरे घराण्याने तरुणांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी आणि आदित्य ठाकरे यांनी या तरुण पिढीच्या संघर्षाचे कौतुक केले आहे. त्यामुळे मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरलेली दिसली. विशेषतः दिल्ल्लीतील जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाच्या तुलनेत मुंबईतील आंदोलन मोठे झाले. त्यामुळेच केंद्र सरकारला ठाकरे बंधूनी आयोजित केलेल्या रविवारी होत असलेल्या मोर्चापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला.
तरुणांमधील वाढता प्रभाव, आक्रमक भूमिका
दिल्लीतील सीजेपीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापले होते. याची जाणीव ठाकरे बंधूना झाली. त्यामुळेच त्यांनी तात्काळ पावले उचलत सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. पेपरफुटी आणि इतर प्रश्नांवर तरुणांच्या संतापाला व स्पष्ट भूमिकेला ठाकरे बंधूंकडून मिळणारे समर्थन पाहता. शिवाजी पार्कवर झालेल्या आंदोलनात सहभागी होत तरुणाने उत्साह दाखवला. त्याचवेळी तरुणांमधील वाढता प्रभाव आक्रमक भूमिका देखील त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली.
ठाकरे बंधूंना होणार राजकीय फायदा
विद्यार्थ्यांमधील असंतोष ठाकरे बंधूंनी अचूक टिपला. अमित आणि आदित्य या दोन्ही युवा चेहऱ्यांचा त्यांना फायदा मिळाला. पोलिस धरपकडीमुळे भांबावलेल्या विद्यार्थ्यांना ठाकरे मैदानात उतरल्यामुळे बळ मिळाले आहे. या आंदोलनाला ठाकरेंनी साथ दिली, हे ‘जेन झीं’च्या मनात पक्के बसले आहे, त्यामुळे या आंदोलनाला पाठींबा देणे ठाकरे बंधूंच्या दृष्टीने फायदेशीर ठरले आहे.
गेल्या काही दिवसाच्या राजकीय घडामोडी पहिल्या तर हिंदुत्त्वाचा मुद्दा ठाकरे बंधूंच्या हातून निसटला आहे. अनेक वर्षांनंतर जात, धर्म सोडून तरुण वर्ग रस्त्यावर उतरला होता. तरुणाईच्या आंदोलनाची ही पोकळी व्यापण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूनी या निमित्ताने केला. विद्यार्थ्यांमध्ये सरकारविरोधी टोकाची भूमिका तयार झाली होती. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांसोबत राहण्याची संधी ठाकरे बंधूंनी अचूक साधली. या निमित्ताने राजकारणात गमावलेली जागा पुन्हा निर्माण करण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.
सोशल मीडिया व क्रेझ
उद्धव व राज ठाकरे यांच्याबद्दल पूर्वीपासूनच युवा मंडळीत क्रेझ आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून रॅलीज आणि सभांमध्ये तरुणांचा (Gen Z) सहभाग होता. दुसरीकडे मात्र मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने युवकांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. त्यामुळे युवा वर्गाला ठाकरे ब्रँडबद्दलचे आकर्षण वाढले आहे. विशेषतः आदित्य ठाकरे व अमित ठाकरे हे रस्त्यावर उतरल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत गेला. त्यासोबतच सोशल मीडियावर देखील उद्धव व राज ठाकरे यांच्याबद्दल क्रेझ आहे.
आव्हाने आणि बदल राजकीय समिकरणे
आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईत झालेली गर्दी व मिळालेला प्रतिसाद पाहता. राज-उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळाला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच क्रेझ या निमित्ताने झाली आहे. त्यामुळे येत्या काळात ही क्रेझ तात्कालिक आंदोलना पुरती मर्यादित राहते की प्रत्यक्ष मतदान व राजकीय निष्ठांमध्ये बदलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नव्या पिढीचा बदलता दृष्टिकोन
आजची तरुणाई केवळ नावापेक्षा थेट कामाला आणि उत्तरदायित्वाला अधिक महत्त्व देत आहे. त्यामुळे तरुणाईच्या मनात नेमके काय चालले हे ओळखणे खूप अवघड आहे. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षाचा कालावधी आहे. त्यामुळे येत्या काळात या आंदोलनाचा व ठाकरे बंधू यांच्या विषयी निर्माण झालेला फायदा प्रत्यक्षात मतदानाद्वारे कितपत होणार, हे पाहण्यासाठी येत्या काळात होत असलेल्या निवडणूक निकालाची वाट पाहावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.