Thackeray brothers meeting : ठाकरे बंधूंच्या आणखी एका भेटीचा मुहूर्त ठरला; घटस्थापनेदिवशी शिवाजी पार्कवर युतीचे 'घट' बसणार?

Shiv Sena alliance News : या निमित्ताने घटस्थापनेदिवशीच शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसेच्या युतीचे 'घट' बसणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Raj Thackeray Uddhav Thackeray
Raj Thackeray Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापले असतानाच आता राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. सोमवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.

शिवाजी पार्क जिमखाना एसपीजीच्या प्रस्तावित इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. या निमित्ताने घटस्थापनेदिवशीच शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसेच्या युतीचे 'घट' बसणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेले राज व उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) हे बंधू गेल्या दोन महिन्यात पाच वेळा एकत्र आले. त्यामुळे येत्या काळात मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची युती होण्याची शक्यता आहे. त्यातच आता सोमवारी घटस्थापनेदिवशी शिवाजी पार्कमधील जिमखान्याचे भूमिपूजन करण्यासाठी पुन्हा राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे समजते. त्या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरु आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray
Bjp News : महाराष्ट्र भाजपवर चंद्रशेखर बावनकुळेंची जादू कायम; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण 15 दिवसांत घेणार मोठा निर्णय

मराठीचा मुद्दा, हिंदीची सक्ती यावरून जुलै महिन्यात उद्धव व राज ठाकरे पहिल्यांदा एकत्र आले होते, त्यानंतर वरळी डोममध्ये दोघांनी एकत्र मेळावा घेतला. त्यानंतरही दोन्ही भावांनी सार्वजनिकरित्या एकमेकांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तर गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी राज व उद्धव यांची राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) घरीच भेट झाली, आगामी निवडणुक, त्यासाठीची रणनिती यावरून त्यांच्यामध्ये अनेक तास चर्चा झाली.

Raj Thackeray Uddhav Thackeray
BJP News : भाजपचे इच्छुक बारमध्ये झिंगले, 'मंत्र्यांबद्दल' नको ते बरळले... मुंबईत तिकीट मागायला गेलेले नेते आता उमेदवारीच नको म्हणतायत!

हा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. याच ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक ऐतिहासिक दसरा मेळावे घेतले, आणि याच ठिकाणी त्यांचे स्मृतिस्थळ आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray
Ajit Pawar Warning: 'वेळ नसेल, तर खुर्ची रिकामी करा...'; अजितदादांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना झाप झाप झापलं

बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर किंवा बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारावेळी वगळता हे दोन्ही बंधू सार्वजनिक कार्यक्रमात फारसे एकत्र आलेले नाहीत. त्यामुळे घटस्थापनेसारख्या शुभदिनी ते एकत्र येणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray
Shiv Sena Politics : शिंदेंची शिवसेना ठाकरेंचा उरलासुरला पक्षही फोडणार; कोल्हापुरात लवकरच मोठा धमाका...

हा कार्यक्रम जरी एक सामाजिक आणि बिगर-राजकीय असला, तरी त्यांचे एकत्र येणे हे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना जन्म देऊ शकते. आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता यामुळे वाढली आहे. शिवाजी पार्क जिमखान्याच्या या भूमिपूजन कार्यक्रमाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे ठाकरे बंधूंमधील संबंध सुधारतील आणि पुन्हा एकदा ते एकाच राजकीय दिशेने येतील अशी आशा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray
NCP Ajit Pawar: अजित पवारांचं ठरलं! महापालिका निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com