BJP News : भाजपचे इच्छुक बारमध्ये झिंगले, 'मंत्र्यांबद्दल' नको ते बरळले... मुंबईत तिकीट मागायला गेलेले नेते आता उमेदवारीच नको म्हणतायत!

BJP News : नाशिक भाजपचे चार पदाधिकारी मुंबईत मंत्री भेटायला गेले. भेट न मिळाल्याने ते बारमध्ये दारु प्याले. नशेत मंत्र्यांबद्दल बोललेले शब्द रेकॉर्ड होऊन मंत्र्यापर्यंत पोहोचले.
Nashik BJP leaders caught drunk in a Mumbai bar, audio against minister leaked.
Nashik BJP leaders caught drunk in a Mumbai bar, audio against minister leaked.Sarkarnama
Published on
Updated on

BJP News: भारतीय जनता पक्षाने नाशिक महापालिकेसाठी 100 प्लसचा नारा दिला आहे. यासाठी निवडून येण्याची क्षमता असलेल्या नेत्यांना इतर पक्षांमधूनही आयात केले जात आहे. मात्र यातूनच निष्ठावंत आणि नव्याने पक्षात आलेल्यांमध्ये किती सुप्त संघर्ष आहे याचे उदाहरण नुकतेच घडले. विशेष म्हणजे यामध्ये थेट एका मंत्र्यांचेच नाव गुंतले आहे.

भाजपचे 2 निष्ठावंत माजी नगरसेवक आणि 2 पदाधिकारी काही दिवसांपूर्वी उमेदवारीसाठी मुंबईला गेले होते. हे चौघे मुंबईत पोहोचले त्यादिवशी त्यांची संबंधित मंत्र्यांसोबत भेट होऊ शकली नाही. आता काय करायचं? असा विचार करून चौघे टाईमपास करण्यासाठी एका बारमध्ये गेले.

पोटात दोन घोट जाताच पोटातील गोष्ट ओठांवर यायला सुरुवात झाली. मुंबईमध्ये असल्याने आता इथे आपलं कोण ऐकत म्हणून चौघेही सुसाट सुटले. यावेळी ज्या मंत्र्यांकडे उमेदवारी मागायचे आहे त्यांचेच किस्से चर्चेत घेतले. गप्पा-गप्पांमध्ये चौघेही जरा जास्तच वाहवत गेले. हे सुरू असतानाच त्याच बारमध्ये शेजारी बसलेल्या संबंधित नेत्याच्या एका निकटवर्तीयांनी मोबाईलवर सर्व संभाषण रेकॉर्ड केले. लागलीस ते संबंधित नेत्याकडे पाठविण्यात आले.

Nashik BJP leaders caught drunk in a Mumbai bar, audio against minister leaked.
BJP ShivsenaUBT alliance claim : उद्धवसेनेची भाजपला मदत? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता, महायुतीमधील समन्वय कोलमडलं!

दुसऱ्या दिवशी इच्छुक पोहोचण्याआधीच त्यांच्या संभाषणाची चर्चा रंगली होती. ह्या प्रकाराने महापालिकेचा कारभार पाहणारा भाजपचा तो कारभारी रागाने लालबुंद झाला होता. संबंधित मंत्र्यांनी या चौघांनाही व्यवस्थित शब्दांमध्ये समज दिली. त्यांना तातडीने नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले. हे चौघे नाशिकला पोहोचले तोपर्यंत त्यांना पक्षातून हकलपट्टी करा असा आदेश पोहोचला होता.

Nashik BJP leaders caught drunk in a Mumbai bar, audio against minister leaked.
BJP Ganesh Naik warning : शिंदेंच्या शिवसेनेची भाजप मंत्र्यांविरोधात न्यायालयात धाव; गणेश नाईकांचा, 'दम है तो रोक के बताओ'चा इशारा

मात्र हकालपट्टी केल्यास त्याची चर्चा आणखी रंगण्याची भीती होती. हे विचारात घेऊन स्थानिक नेत्यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे बडतर्फीचा आदेश थांबला. केवळ माफी नाम्यावर प्रकार निभावला. पण बारमध्ये केलेल्या चर्चेने भाजपच्या या चार निष्ठावंतांवर 'संकट' ओढवले. मात्र माजी नगरसेवक आणि निष्ठावंत असूनही हे संकट हरण करण्यासाठी कोणीही मदतीला आला नाही, हे विशेष!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com