Vidhan Parishad Election 2024 : विधानपरिषदेचं पिक्चर क्लिअर; 'कशा' असणार लढती?

Vidhan Parishad Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. येत्या 26 जूनला विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी मतदान होणार आहे.
Vidhan Parishad Election 2024
Vidhan Parishad Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Vidhan Parishad Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. येत्या 26 जूनला विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये, मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.

तर 1 जुलै रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढलेल्या राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीही जोरदार रणनीती आखल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच एकाच मतदारसंघात मित्रपक्षातील उमेदवार उभे रहायला नकोत याची काळजी युती-आघाडीने घेतली आहे.

त्यानुसार आता कोकण पदवीधर मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) संजय मोरे यांनी माघार घेतली आहे.तर आता या ठिकाणी भाजपचे निरंजन डावखरे हे उमेदवार असणार आहेत. तर आघाडीते ठाकरे गटाचे किशोर जैन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित सरैया यांनी माघार घेतल्यामुळे आता कोकण मतदारसंघातून काँग्रेसचे रमेश किर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे इथे निरंजन डावखरे विरुद्ध रमेश किर असा सामना रंगणार आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे (Congress) प्रकाश सोनवणे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटाकडून जगन्नाथ अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजी नलावडे यांना उमेदवाी देण्यात आली आहे.मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवाजी शेंडगे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. तर समाजवादी गणराज्य पक्षाकडून सुभाष मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Vidhan Parishad Election 2024
Sharad Pawar : '...पण मतांची कमतरता पडू दिली नाही', शरद पवारांकडून बळीराजाचे कौतुक

शिवसेना विरुद्ध भाजप

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट सामना होणार आहे. या मतदारसंघातून महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे डॉ. दीपक सावंत यांनी माघार घेतली आहे.

Vidhan Parishad Election 2024
Sharad Pawar On Narendra Modi : सत्ता डोक्यात घुसली की मोदींची गॅरंटी चालत नाही,पवारांची मोदींवर टीका !

नाशिक शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता इथून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे निवडणुकीच्या रिंगणात असतील, तर त्यांच्याविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार आणि शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे असणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com