Tribal Development Scam : मंत्र्याच्या आशीर्वादाने कोट्यवधीचा घोटाळा? निकषांविरोधात जाऊन 'त्या' शाळांना मंजुरी

Tribal Development Department : नियमबाह्य पद्धतीने शाळांना मंजुरी देत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आदिवासी मंत्र्यांच्या आशीर्वादाने झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Maharashtra ministry
Maharashtra ministrySarkarnama
Published on
Updated on

Schools Granted Scam : आदिवसाी विद्यार्थ्यांच्या दुरावस्थेमुळे आदिवासी विद्यार्थी विविध ठिकाणी आंदोलन करत आहेत. ही आंदोलन थांबवण्यात सरकारला यश आले असतानाच पुन्हा आदिवासी विभागातील सावळा गोंधळ समोर आला आहे. आदिवासी मंत्र्यांच्या आशीर्वादाने कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे, असे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित निवासी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देण्याच्या योजनेत मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी नियमबाह्य श्रेणीवाढ दिलीय. या माध्यमातून खासगी शाळांना शेकडो कोटींचा लाभ मिळवून देण्यात आला आल्याचे सांगितले जात आहे. निर्णयाच्या विरोधात जाऊन 26 शाळांना श्रेणीवाढ दिल्याचे उघड झाले असून, मंत्र्यांच्या आदेशानं शाळांना मंजुरी दिल्याचा कॅगनं ठपका ठेवला आहे.

2010 मध्ये आदिवासी विभागाने योजना सुरु केली होती. या योजनेनुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश दिला जात होता. या शाळांचे श्रेणी केल्या जात असून त्यामध्ये शाळांना प्रत्येक विद्यार्थ्यांमागे प्रतिवर्षी अनुदान दिले जात होते. वर्षाला तब्बल यावर 250 कोटी रुपये खर्च केले जात होते. 2018 पासून या योजनेवर 1 हजार 398 रुपये खर्च केले जात होते.

Maharashtra ministry
Fadnavis Government: विद्यार्थ्यांच्या दणक्यानंतर फडणवीस सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर : फक्त 20 दिवसांत काढले 12 शासन निर्णय

दरम्यान, आदिवासी विभागाने आपल्याच निर्णयाच्या विरोधात जात 26 शाळांना श्रेणीवाढ दिली. शाळांना मान्यत देण्यासाठी श्रेणीवाढसाठी समिती आहे. मात्र, तीन ते चार शाळांना नियमबाह्यपद्धतीने मंत्रीस्तरावरून मान्यता दिल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे आदिवासी मंत्र्यांच्या आशीर्वादाने हे झाल्याची चर्चा आहे. तसेच शाळांना दोन कोटी 82 लाख रुपये दिल्याचे समोर आले आहे. सचिव स्तरावरील समितीने शाळांना वगळले होते तरी देखील त्यांना मान्यता दिल्याचे समोर आले आहे.

Maharashtra ministry
Sanjay Jadhav Meet Manoj Jarange : खासदार संजय जाधवांकडून डॅमेज कंट्रोल, मनोज जरांगे पाटलांची घेतली भेट, म्हणाले, 'मराठा समाजाच्या न्याय्य ...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com