Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट; उपमुख्यमंत्र्यांकडून विशेष सूचना, महिलांबाबतच्या 'या' प्रोडक्टवर धडाकेबाज कारवाईचे संकेत

Tukaram Mundhe: IAS तुकाराम मुंढे हे सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत. त्यांनी अन्नभेसळ आणि बनावट औषधांविरोधात जोरदार मोहिम राबवली आहे. त्यामुळं जनमाणसातून त्यांच्या कार्याचं कौतुक होत आहे.
Sunetra Pawar_Tukaram Mundhe
Sunetra Pawar_Tukaram Mundhe
Published on
Updated on

Tukaram Mundhe: IAS तुकाराम मुंढे हे सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत. त्यांनी अन्नभेसळ आणि बनावट औषधांविरोधात जोरदार मोहिम राबवली आहे. त्यामुळं जनमाणसातून त्यांच्या कार्याचं कौतुक होत आहे. जनतेच्या कौतुकास पात्र ठरलेल्या या तुकाराम मुंढे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. याभेटीदरम्यान मुंढे यांच्या कार्याची तसंच इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली असल्याचं कळतंय.

Sunetra Pawar_Tukaram Mundhe
प्लॅस्टिकच्या नोटा येणार चलनात; वेगळ्या कशा? फायदे-तोटे काय?

सुनेत्रा पवार यांनी स्वतः आपल्या सोशल मीडियातून तुकाराम मुंढेंच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसंच त्यांच्या कार्याचा गौरवही केला आहे. यावेळी मुंढे हे प्रसन्न मुद्रेनं उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना दिसत आहेत. सुनेत्रा पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "श्री. तुकाराम मुंढे यांनी सदिच्छा भेट घेत विविध विषयांवर तसंच सुरू असलेल्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी सौंदर्यप्रसाधनं, औषधनिर्मिती तसंच ग्राहक वस्तूंच्या विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये कालबाह्य उत्पादनं विक्रीस ठेवली जात नसल्याची खात्री करण्यासाठी प्रभावी तपासणी मोहीम राबवणं व आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचना त्यांना केल्या. नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे."

Sunil Tatkare: प्रशांत किशोर यांच्या कथित नाराजीवर तटकरेंचं स्पष्टीकरण; सुनेत्रा पवारांसोबत भेट झाल्याच्या वृत्तालाही दिला दुजोरा देत म्हणाले, मी ४१ वर्षे राजकारणात..

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन या विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ हे आहेत. झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख या नात्यानं तुकाराम मुंढे यांनी आपल्या कामाचा आढावा सुनेत्रा पवार यांना सांगितला. यावेळी महिलांसाठी वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधन ज्यांमध्ये देखील औषधांचा वापर केला जातो, त्यातील गैरप्रकारांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना पवार यांनी मुंढे यांना दिल्या आहेत.

Sunetra Pawar_Tukaram Mundhe
Sunil Tatkare: "सुनेत्रा पवारांसोबत भेट झाली, पण..."; प्रशांत किशोर प्रकरणावर सुनील तटकरेंचं सविस्तर स्पष्टीकरण

त्यामुळं यापुढच्या काळात आता कॉस्मेटिक इंडस्ट्री ही तुकाराम मुंढे यांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळं मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या स्वस्तातल्या बनावट विविध प्रकारच्या सौंदर्यप्रसाधन विकणाऱ्यांवर कारवाईचा मोठा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं यापुढे नेमकी काय आणि कशी कारवाई होते हे पाहावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com