Uddhav Thackeray : 'अमित शहांनी नाक घासून दादांची माफी मागावी!' उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray statement on Amit Shah : अमित शाहांनी नाक घासून दादांची माफी मागावी, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. अमित शाह आणि अजित पवार यांच्याबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या.
Uddhav Thackeray statement on Amit Shah
Uddhav Thackeray statement on Amit ShahSarkarnama
Published on: 
Updated on: 

पुण्यात अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार हयात असताना त्यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या अमित शाह यांनी आता त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी माफी मागायला हवी होती, अशी टीका ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्या जुन्या आरोपांची आठवण करून देत त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते. त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांचे जगणे मुश्किल केले. मात्र, आता त्याच नेत्यांच्या हस्ते अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण होणे दुर्दैवी असल्याचे ठाकरे म्हणाले. पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी अमित शाह यांनी अजितदादांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागायला हवी होती, असा घणाघात त्यांनी केला.

Uddhav Thackeray statement on Amit Shah
Kolhapur news : अब्जावधीपेक्षा नगरसेवकांना 3 कोटींचं दुःख, दम नव्हता तर सभा घेतली कशाला?

दरम्यान, संजय राऊत यांनीही या कार्यक्रमावरून भाजपला लक्ष्य केले. अजित पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांनीच आता त्यांच्या मैत्रीचे गोडवे गाणे ही मोठी राजकीय विडंबना असल्याचे राऊत म्हणाले. ईडी आणि सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांचा दबाव निर्माण करण्यात आला आणि त्यामुळेच अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीत प्रवेश केला, असा दावाही त्यांनी केला.

याशिवाय, अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या तपासावरही संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले. इतकी जवळची मैत्री होती, तर त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणात गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल त्यांनी केला.

Uddhav Thackeray statement on Amit Shah
Bogus School ID Scam: बोगस शालार्थ 'आयडी'प्रकरणी शिक्षकांवर मोठी कारवाई; आता थेट 'SIT' कडून होणार चौकशी, पगारही रोखले!

एकीकडे अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले जात असताना दुसरीकडे त्यांच्या जुन्या राजकीय संघर्षावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाचे कारण ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.