

Mumbai News : राज्यात गेल्या चार दिवसापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठया घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता राज्यातील या वेगवान घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभागप्रमुखाची तातडीची बैठक गुरुवारी दुपारनंतर मातोश्रीवर बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत आगामी काळासाठी पक्षाची रणनीती काय ठरणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या विभागप्रमुखांची एक महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी मातोश्रीवर बोलावली आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या तयारीवर चर्चा केली जाणार आहे. दरवर्षी 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन पाळला जातो. या दिवशी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी आदरांजली वाहण्यासाठी येतात. या वर्षीच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन कसे असावे, कार्यकर्त्यांची गर्दी व्यवस्थापन आणि एकंदर तयारी कशी करावी, यावर या बैठकीत विस्तृत चर्चा होणार आहे.
त्यासोबतच राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीतीवरही काही प्रमाणात विचारमंथन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासाठी हा स्मृतिदिन शक्तीप्रदर्शन आणि एकजुटीचा संदेश देण्याची एक संधी असतो. त्यामुळे या बैठकीत केवळ कार्यक्रमाच्या तयारीवरच नव्हे, तर पक्षाच्या आगामी रणनीतीवरही काही प्रमाणात विचारमंथन होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचा विभागप्रमुख हे पक्षसंघटनेचा महत्त्वाचा दुवा असल्याने, त्यांच्याकडून स्थानिक पातळीवरील स्थितीचा आढावा घेतला जाईल आणि स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी योग्य दिशा दिली जाईल. त्यामुळे मातोश्रीवर होत असलेली ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.