shivsena UBT news : ठाकरे ओमराजेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; धाराशिवमधील 'त्या' नेत्यांना मातोश्रीवर बोलावले

Dharashiv politics News : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा सरसावले आहेत. त्यामुळेच शनिवारी 20 जूनला धाराशिव मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
Uddhav thackeray, Omraje Nimbalkar
Uddhav thackeray, Omraje Nimbalkar Sarkarnama
Published on
Updated on

Mumabi News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर हे बंडखोरी करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे फुटलेले हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी 19 जूनला शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. तर दुसरीकडे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा सरसावले आहेत. त्यामुळेच शनिवारी 20 जूनला धाराशिव मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

या बैठकीला आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय सूचना देतात त्यानुसार पुढील रणनीती काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav thackeray, Omraje Nimbalkar
Sangli-Satara MLC : सांगली-साताऱ्याबाबत महायुतीचा मोठा निर्णय; फडणवीस, शिंदे, तटकरेंची एकत्रित बैठक

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता मतदारसंघातील पक्षबांधणीसाठी रणनीती आखण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय सूचना देतात त्यानुसार पुढील रणनीती असणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Uddhav thackeray, Omraje Nimbalkar
tractor march: खासदारांसोबतची बैठक संपताच उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; 'या' मुद्द्यावरून थेट सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार!

उद्धव ठाकरे यांनी डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मातोश्रीवर शनिवारी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीस धाराशिव मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत संघटनात्मकदृष्ट्या काय बदल करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav thackeray, Omraje Nimbalkar
Shivsena Politics : 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू होताच ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक; पण 'या' खासदाराने टाकला मिठाचा खडा? धक्कादायक माहिती समोर...

दरम्यान, आमदार कैलास पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी अजूनही माझा संपर्क झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे व यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मी जात आहे, प्रमुख पदाधिकारी आम्ही जात असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच शनिवारी मुंबईत आमदार, जिल्हाप्रमुख , संपर्कप्रमुख यांची बैठक बोलावली आहे. पक्षप्रमुख काय सूचना देतात त्यानुसार पुढील रणनीती असणार, असेही कैलास पाटील म्हणाले.

Uddhav thackeray, Omraje Nimbalkar
Maharashtra politics : मातोश्रीवरील ठाकरेंच्या खासदारांची बैठक संपताच सीएम फडणवीसांचा थेट वार; मोजक्या शब्दांतच लगावला टोला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com