Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या आमदाराने बैठकीला गैरहजर राहण्याचे थेट कारणच सांगितले; म्हणाले.'आमचा उमेदवार...'

UBT MLAs meeting News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी सोमवारी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
Uddhav-Thackeray.jpg
Uddhav-Thackeray.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी सोमवारी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दक्षता घेत आता आमदारांची बैठक बोलवली होती. मात्र, या आमदारांच्या बैठकीला 20 पैकी 4 आमदार गैरहजर असल्याचे पुढे आले आहे. या चार आमदारांनी दांडी मारताच चर्चेला उधाण आले असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी बैठकीला गैरहजर राहण्याचे थेट कारणच सांगितले आहे.

विधानसभेच्या आणि विधानपरिषदेच्या आमदारांची बैठक उद्धव ठाकरे यांनी सोमवारी बोलावली होती. या बैठकीला संजय देरकर, संजय पोतनीस, राहुल पाटील आणि सुनील शिंदे हे चार आमदार गैरहजर होते. या बैठकीला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले.

Uddhav-Thackeray.jpg
Uddhav Thackeray Strategy Fail : उद्धव ठाकरेंचे नेमकं काय चुकलं? दुसऱ्यांदा खासदार फुटले! 'हे' आहेत कमजोर दुवे

ठाकरेंच्या सेनेचे (Shivsena) परभणीतील आमदार राहुल पाटील या बैठकीला उपस्थित नसल्यासंदर्भातील कारण सांगितले आहे. विधानपरिषदेच्या मतमोजणीचा दिवस होता, आमचे उमेदवार उभे केले होते, त्यामुळं इथं थांबलो होतो, आम्हाला आमचा उमेदवार विजयी होईल,' अशी अपेक्षा होती, असे स्पष्ट केले.

Uddhav-Thackeray.jpg
Uddhav Thackeray Strategy Fail : उद्धव ठाकरेंचे नेमकं काय चुकलं? दुसऱ्यांदा खासदार फुटले! 'हे' आहेत कमजोर दुवे

महाविकास आघाडीकडे केवळ 45 मते असताना आम्हाला 169 मते मिळाली आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शनिवारी परभणीमध्ये येत आहेत, रविवारी शिवसेनेचा मेळावा असल्याने तयारीसाठी थांबलो होतो, मी उद्या येणार आहे, कोणीही गैरसमज करुन घेऊ नये, आमदार राहुल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मतमोजणी असल्याने आज येऊ शकत नाही, असे पक्ष कार्यालयात सांगितले होते, असे पाटील म्हणाले.

Uddhav-Thackeray.jpg
Rahul Patil News : आमदार राहुल पाटलांचा विरोधकांना आक्रमक इशारा : म्हणाले,'असे किती आले अन्...'

17 जागांपैकी परभणीची जागा चुरशीची होती, आमचे नगरसेवक जिगरीने लढले होते, त्यामुळं परभणीत थांबलो होतो, असं राहुल पाटील म्हणाले. सहा खासदारांनी बंडखोरी केली नसून ती गद्दारी आहे. आमदारांबाबत केला जाणारा चुकीचा आहे, राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.

खासदार विकासासाठी निवडून गेले असं सांगतात, त्यांना विकासासाठी मतदान झालं होतं का? यांना कशासाठी मतदान दिलं होतं? यांनी कोणाच्या जीवावर मतदान मागितलं होतं. सत्तेत गेल्यावर विकास होतो का? विरोधात राहिल्यावर विकास होत नाही का? शेवटी महाराष्ट्र आणि देश एकसंघ आहे, विकास सगळीकडे झाला पाहिजे. 18 -18 लाख मतदारांनी मतदान केलं त्यांचा अपमान नाही का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Uddhav-Thackeray.jpg
Shivsena UBT News : आधी नगरसेवक होईन, मगच लग्न; उद्धव ठाकरेंचा शिलेदाराला फोन, आता चांगली मुलगी बघ!

खासदार विकासासाठी निवडून गेले असं सांगतात, त्यांना विकासासाठी मतदान झालं होतं का? यांना कशासाठी मतदान दिलं होतं? यांनी कोणाच्या जीवावर मतदान मागितलं होतं. सत्तेत गेल्यावर विकास होतो का? विरोधात राहिल्यावर विकास होत नाही का? शेवटी महाराष्ट्र आणि देश एकसंघ आहे, विकास सगळीकडे झाला पाहिजे. 18 -18 लाख मतदारांनी मतदान केलं त्यांचा अपमान नाही का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Uddhav-Thackeray.jpg
Shivsena UBT News : तहान भागवल्याचे क्रेडिट उद्धव ठाकरेंना नाहीच; भाजपच्या महापौरांनी नाकारला अभिनंदनाचा ठराव, नगरसेवकांना काढले सभागृहाबाहेर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com