Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : उद्धव ठाकरेंची शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर...? महायुती सरकारमधीलच माजी मंत्र्यांचा दावा

Deepak Kesarkar News : माजी मंत्री दीपक केसरकर यांनी वक्फ विधेयकावरही शिवसेना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,उद्धव ठाकरे यांच्यासाठी फतवे निघाले आहेत.पण आम्ही कोणत्याही धर्मात भेदभाव करत नाही. मात्र,जेव्हा मोठ्या मालमत्ता असतात, तेव्हा....
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतला सर्वात मोठा उठाव घडवून आणला होता. या घटनेला जवळपास पावणेतीन वर्षांचा कालावधी लोटला असला तरी त्याबाबतचे दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे शिवसेनेसह महायुतीच्या नेतेमंडळींकडून सातत्यानं समोर येत असतात. आता माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे कट्टर समर्थक दीपक केसरकर यांनी आता एक नवा खळबळजनक दावा केला आहे.

माजी शालेय शिक्षणमंत्री व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी गुरुवारी (ता.3 एप्रिल) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे. केसरकर म्हणाले, एकनाथ शिंदेंनी जून 2022 मध्ये मोठा निर्णय घेत शिवसेनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

त्यांच्या याच निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं होतं. याचमुळे उद्धव ठाकरेंना मविआ सरकारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याची गौप्यस्फोट केसरकरांनी यावेळी केला आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Jaykumar Gore: जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी अपडेट! तक्रारदार महिला पुण्यातील निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या संपर्कात ?

ते म्हणाले, पक्षप्रमुखांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. पण त्यावेळी शिंदेंनी पुन्हा युतीची स्थापना करावी अशी अट घातली.ती मान्य न झाल्यानं शिंदे यांनी आपल्या सोबतच्या आमदारांसह पुढचं पाऊल उचललं आणि राज्यात भाजप शिवसेना युतीचं सरकार सत्तेत आलं, असंही केसरकरांनी यावेळी सांगितलं.

यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी वक्फ विधेयकावरही शिवसेना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,उद्धव ठाकरे यांच्यासाठी फतवे निघाले आहेत.पण आम्ही कोणत्याही धर्मात भेदभाव करत नाही. मात्र,जेव्हा मोठ्या मालमत्ता असतात, तेव्हा त्यांचे परफेक्ट मॅनेजमेंट व्हायला हवं,असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Supreme Court Justice : मोठी बातमी: सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसह सर्वच न्यायमूर्तींनी उचललं मोठं पाऊल; संपत्ती...

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले, "तुम्ही (भाजप) खुश दिसत आहात, पण मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती. जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का?" त्यांच्या या टीकेमुळे सभागृहात गोंधळ उडाला. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com