Mahavikas Aaghadi : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी मंत्र्यांच्या मुलीचा काँग्रेस प्रवेश निश्चित : विधानपरिषदेसाठी तिकीट फायनल होणार?

Aditi Pohare Congress Vs Shivsena UBT : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेवार जाहीर केलेला असताना काँग्रेसने देखील धक्कातंत्र अवलंबत आपला उमेदवार जाहीर करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Teachers Mla News : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, शिक्षक संघटनांनी राजकीय पक्षांचा आधार घेतल्याने ही निवडणूक पूर्णपणे पक्षीय वळणावर आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अद्याप जाहीर झाले नसले, तरी पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. त्यातच अमरावतीमध्ये काँग्रेसने उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला आहे.

महाविकास आघाडीत उमेदवारीवरून चुरस वाढली आहे. मूळच्या अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आणि अकोल्याच्या स्नूषा अदिती पोहरे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. त्या आज (गुरुवारी ) मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचवेळी त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जाते.

अदिती पोहरे श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या आहेत. दरम्यान, बुलढाणा येथील दत्तात्रय लहाने यांना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने यापूर्वीच उमेदवार म्हणून जाहीर केले होते. त्यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत मेळावाही घेतला होता. मात्र, काँग्रेसकडून उमेदवारीबाबत हालचाली वाढल्याने आता दत्तात्रय लहाने यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

बंडखोरीची शक्यता

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगण्याचे संकेत आहेत. विद्यमान सदस्य किरण सरनाईक आणि अदिती पोहरे यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी दोन्ही आघाड्यांमधील संभाव्य बंडखोरी आणि शिक्षक संघटनांची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

महायुतीत भाजपने हा मतदारसंघ आपल्या वाट्याला मिळावा, अशी मागणी केली असली, तरी शिवसेनेत सहभागी झालेले विद्यमान आमदार किरण सरनाईक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. त्यामुळे भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा असलेल्या इच्छुकांमध्ये नाराजी वाढली असून, काहींनी अपक्ष किंवा बंडखोर उमेदवारीची तयारी केली आहे.

शिवसेनेत चुरस

संगीता शिंदे आणि शेखर भोयर यांनी भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत, तर माजी सदस्य श्रीकांत देशपांडे यांनीही शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी केली. पक्षाने उमेदवारी नाकारली, तरी हे तिन्ही इच्छुक निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने किरण सरनाईक यांच्यासमोरील आव्हाने वाढण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com