Uddhav Thackeray : ठाकरेंना मोठा धक्का! खासदारांनंतर आता आमदारही फुटले? 4 आमदार शिंदेंच्या गळाला? 12 आमदारांचा पाठिंबा असल्याचा मोठा दावा!

Eknath Shinde Operation Tiger : ऑपरेशन टायगरमध्ये उद्धव ठाकरेंचे खासदार फोडल्यानंतर अजून मोठे धक्के बाकी असल्याची घोषणा विधीमंडळाच्या पटलावरून एकनाथ शिंदेंनी केली होती.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नुकताच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का लागला असून त्यांच्या शिवसेनेचे तब्बल सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरेंकडे आता तीनच खासदार उरले असून संसदेतील त्याचे कार्यालय देखील गेल्यात जमा आहे. अशातच आता विधीमंडळाच्या पटलावरून एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरबाबत स्पष्ट संकेत देत अद्याप मोठे धक्के बसणे बाकी असल्याचे म्हटले होते.

अशातच ठाकरेंचे आमदार देखील फुटणार अशी चर्चा सुरू आहे. या चर्चे दरम्यान ठाकरेंचे चार आमदारांनी शिंदेंची भेट घेतल्याची कुजबूज आहे. तर या चार आमदारांनी आपल्या सोबत 12 आमदार असल्याचा दावा केला आहे. तर आपल्या सह ते आमदार शिंदेंसोबत असल्याचे आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती आहे. तर या आमदारांनी अलीकडच्या काळात शिंदेंची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन टायगरच्या दुसऱ्या अंकाला लवकरच सुरूवात होईल असे संकेत खुद्द शिंदेंनीच दिले होते. यानंतर दुसरा अंक हा ठाकरेंचे आमदार असणार असून 14 ते 16 खासदार फोडले जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता ऑपरेशन टायगर 2.0 सक्रिय झाल्याचे चित्र समोर आले आहे.

Uddhav Thackeray
Operation Tiger News : सीएम फडणवीसांच्या 'मास्टरस्ट्रोक'ने शिंदेंचे ऑपरेशन टायगर यशस्वी; सहाव्या खासदाराने वाढवले होते टेन्शन, अखेरच्या क्षणी नेमके काय घडले...

ठाकरेंचे खासदार एकीकडे फुटत असतानाच ठाकरेंच्या चार आमदारांनी दोन तीन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचे वृत्त एबीपी माझ्याने दिले आहे. हे वृत्त एबीपी माझ्याच्या सुत्रांच्या हवाल्याने देण्यात आले असून यात या चार आमदारांनी आपल्या सोबत ठाकरेंचे 12 आमजदार असल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या 20 असून त्यापैकी दोन तृतियांश आमदारांची संख्या 14-15 इतकी होते. त्यामुळे आता ठाकरेंना आगामी काळात ऑपरेशन टायगर 2.0 ला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. तर या चार आमदारांनी दोन ते तीन महिन्यात चौदा ते पंधरा आमदारांचा एकत्र करू असे आश्वासन शिंदेंना दिल्याचे वृत्त आहे.

तसेच या आमदारांनी आत्ताच ऑपरेशन टायगर ठाकरेंचे खासदार फोडले असून पक्षांतरामुळे सध्या राज्यात असंतोषाची लाट तयार झाली आहे. आता लगेच आमदार फुटल्यास रोष वाढू शकतो. यामुळे आता आमदारांचे ऑपरेशन टायगर दोन ते तीन महिने नको अशी भूमिका मांडल्याचेही वृत्त आहे. आता ज्या पद्धतीने ठाकरेंचे खासदार कसे फुटले? ते कसे भेटले? याबाबत जशी गुप्तता ठेवण्यात आली. तशीच गुप्तता शिंदेना कोण आमदार भेटले याबाबतही ठेवली जात आहे.

Uddhav Thackeray
Operation Tiger : महाराष्ट्रात पुतळे जाळले, दिल्लीत हायअलर्ट! बंडखोर खासदारांच्या घराबाहेर 'नो एंट्री'चे आदेश! दिल्ली पोलिसांचा तगडा बंदोबस्त

दरम्यान खासदार नरेश मस्के यांनी ठाकरेंना टोला गलावत आता बैठका आणि दौरे करून काय उपयोग? उद्धव ठाकरे पक्षप्रमुख वाटत नाहीत, उलट त्यांच्याबरोबर असणारी माणसंच आपणच पक्षप्रमुख आहेत, अशा आवेगात वावरतात. याच सर्व गोष्टींना आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते वैतागले असून ते एकनाथ शिंदे यांच्याशी जोडले जात आहेत. ठाकरेंच्या भूमिकांना कंटाळून पदाधिकारी, कार्यकर्ते बाहेर पडत आहेत, ते उबाठाची साथ सोडत आहेत, असा दावा नरेश मस्के यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com