Operation Tiger : महाराष्ट्रात पुतळे जाळले, दिल्लीत हायअलर्ट! बंडखोर खासदारांच्या घराबाहेर 'नो एंट्री'चे आदेश! दिल्ली पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Delhi Police Increase Protection For Rebel MPs Over Maharashtra Political Crisis : ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ खासदारांनी पक्षाच्या दिल्लीतील महत्त्वपूर्ण बैठकीला दांडी मारत बंडखोरी केली. तसेच महाराष्ट्रात परतत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
Thackeray group rebel MPs
Thackeray group rebel MPssarkarnama
Published on
Updated on

News Delhi News : महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'च्या निमित्ताने सुरू असलेल्या प्रचंड राजकीय घडामोडींची धग आता देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या प्रमुख खासदारांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर हा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर परवानगीशिवाय प्रवेश नाही म्हणत हे 'नो एंट्री'चे आदेश सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी लावत अत्यंत कठोर पावले उचलली आहेत.

राज्यात गेल्या काही महिन्यापासून 'ऑपरेशन टायगर'च्या जोरदार चर्चा होत्या. तर सतत ठाकरेंचे खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री करत होते. दरम्यान 'ऑपरेशन टायगर' आता शेवटच्या स्टेजवर आले असून ठाकरेंचे तब्बल ६ खासदार फुटणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि ठाकरेंनी दिल्लीत पक्षाच्या बैठकीचे आदेश दिले.

तसा पक्षादेश देखील काढला मात्र यावेळी ९ लोकसभा खासदारांपैकी ६ खासदारांनी पक्षाच्या दिल्लीतील महत्त्वपूर्ण बैठकीला दांडी मारली. यामुळे हे खासदार शिंदेंच्या गळाला लागल्याची बातमी वाऱ्यागत महाराष्ट्रात पसरली.

Thackeray group rebel MPs
Operation Tiger : शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'ला भाजप आमदाराचा विरोध? आमदारांच्या पक्षप्रवेशावर उठवले सवाल; म्हणाले, 'खासदारांचे...'

तर सोमवारी (ता.२२) ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख आणि नागेश पाटील-आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई शिवसेनेत प्रवेश केला. खासदारांच्या या पवित्र्यामुळे महाराष्ट्रात शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले असून जागोजागी निदर्शने आणि पुतळे जाळण्याचे प्रकार सुरू आहेत. तर खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना इशारा देत 'ऑपरेशन तुडवा' सुरू करण्याचा इशारा दिला होता.

याचपार्श्वभूमीवर संभाव्य रोषाचा धोका लक्षात घेऊन आधीच गृह विभागाने या खासदारांना महाराष्ट्रात 'Y-Plus' दर्जाची सुरक्षा दिली होती. आता दिल्लीतील त्यांच्या हालचालींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दिल्ली पोलिसांनी कडक पावले उचलली आहे.

Thackeray group rebel MPs
Operation Tiger update : 'ऑपरेशन' करूनच खासदार फोडले! एकनाथ शिंदेंनी ओमराजे, आष्टीकरांना उघडे पाडले...

दिल्ली पोलिसांकडून या खासदारांच्या घराबाहेर चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. दिल्लीतील त्यांच्या घरांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. तसेच या खासदारांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी 'नो एंट्री'चा आदेश लावत परवानगीशिवाय प्रवेश नाकारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com