Uddhav Thackeray News : विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही, असा टोला लगावला होता. त्याला उद्धव ठाकरेंनी जाहीर कार्यक्रमात उत्तर दिले आहे.
'तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही, हेच तुमचं दुख आहे. माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकांच्या कामांना स्थगिती देऊन ठामपणे नकार द्यायला तेथे उद्धव ठाकरेच पाहिजे ते फडणवीस, येड्या गबाळ्याचे काम नाही.', असे उद्धव ठाकरेंनी ठणकावले
' देवेंद्रजी तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचे असेल तर उद्या अर्थसंकल्प सादर होतो आहे. मी जसं माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. तशी तुम्ही करून दाखवा.', असे आव्हान ठाकरेंनी दिले.
'गोरगरिबांना शिवभोजन दहा रुपयांत देण्याचं हे मी पहिल्या माझ्या अधिवेशनात जाहीर केलं होतं.तुम्ही उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्रातील माता भगिनींना 2100 रुपये जाहीर करून दाखवा मग माझ्याशी बरोबरी करा.', असे देखील ठाकरे म्हणाले.
'मी कोणत्या कामाला स्थगिती दिली होती. आरे काॅलनीतील वृक्ष तोडीला स्थगिती दिली होती. सरकार राहिलं असतं तर आताजे मुलुंडला जे काम अदानीचे काम सुरू आहे ते थांबवले असते. पण तुम्ही सगळं काही उचलून गुजरातला नेताय तुमचे मालक तिकडे बसलेत.', असे देखील ठाकरे म्हणाले.
घाटकोपरची भाषा गुजराती आहे, असे म्हणणारे आरएसएसचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी म्हटले होते. त्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, अनाजी पंतजोशी आले आणि बडबडून गेले. तुमच्या बापाने नाही मुंबई दिली नाही. आम्ही लढून घेतली.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.