Uddhav Thackeray Politics : उद्धव ठाकरेंनी गेम फिरवली! एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, अखेर 'तो' नेता परतला

Bala Pawaskar Joins Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिला आहे. कोकणातील राजकारणत पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी शिंदेंसोबत गेलेला मोठा नेता ठाकरेंनी फोडला आहे.
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे सहा खासदार फोडले. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचे चित्र होते. उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरून फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन आढाव घेणार आहेत. दरम्यान, कोकणातून ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी आली आहे.

दोन वर्षांपूर्वी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले ज्येष्ठ नेते बाळा पावसकर हे स्वगृही परतले आहे. माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या उपस्थितीमध्ये पावसकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

तळ कोकणात विशेष करून सिंधुदुर्ग आणि कुडाळ परिसरातील स्थानिक राजकारणात पावसकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेची पिछेहाट होत असताना पावसकर यांच्या पक्ष प्रवेशाने ठाकरेंना बळ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Shivsena Vs BJP: अब हमारी बारी..! धक्क्यावर धक्के सहन केलेल्या उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी; भाजपला 'जोर का झटका'

कोकणात मजबूत होत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पावसकर हे पुन्हा ठाकरेंकडे गेल्याने मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. ठाकरेंच्या पक्षाची मोट पुन्हा बांधण्यात पावसकर पुढाकार घेणार असल्याची माहिती आहे. तसेच जिल्ह्याचा राजकारणात वैभव नाईक यांना साथ देणार आहेत.

कोल्हापूरमध्ये ठाकरेंना धक्का

कोकणातून ठाकरेंसाठी चांगली बातमी आली असताना कोल्हापूरमध्ये मात्र त्यांना धक्का बसला आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी त्यांच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. कोणतेही कारण आता अथवा राजकीय विश्लेषण न देता राजीनामा देत असल्याचा पत्रात उल्लेख त्यांनी केला आहे. इंगवले यांनी यापूर्वी दोन वेळा शहर प्रमुख राहिले होते. त्यानंतर त्यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाचा कार्यभार देण्यात आला होता.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
BJP vs Shivsena : भाजपने डाव साधला, एकनाथ शिंदेंची धाकधूक वाढली;'त्या' प्रवेशानंतर वर्चस्व राखण्याचे आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com