Uddhav Thackeray News : ठाकरेंनी घाव घातलाच; फडणवीस मुख्यमंत्री होणार तर मग मिंधेंचं काय ?

Political News : महायुती आणि महाविकास आघाडीचे नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सॊडत नाहीत. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकार व पक्ष सोडून गेलेल्या शिंदे गटाच्या आमदारावर निशाणा साधला.
Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis
Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचा दहा दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने जोर लावला आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीचे नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सॊडत नाहीत. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकार व पक्ष सोडून गेलेल्या शिंदे गटाच्या आमदारावर निशाणा साधला. (Uddhav Thackeray News)

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील सभेत बोलताना त्यांनी भाजपने आता जाहीर केलंय की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असणार आहेत. त्यामुळे आता मिंधेंना म्हणावं बस भांडी घासत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. तुम्ही मन की बात करता आम्ही जन की बात करतो, ते खोक्याची बात करतात, आम्ही जन की बात करतो असे म्हणत महायुती सरकारच्या कारभारावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली

Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis
Jharkhand Election : झारखंडमधील हायव्होल्टेज ड्रामा; या कुटुंबातील दोन सुना आमदारकीसाठी झुंजणार

सांगोला मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकआबा साळूंखे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ते गुवाहाटीत जाऊन काय झाडी, काय डोंगर असे म्हणत झाडी व डोंगर मोजतील, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांची खिल्ली उडवली.

Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis
Dhananjay Mahadik News : लाडक्या बहिणीबाबत वादग्रस्त विधान; धनंजय महाडिकांना निवडणूक आयोगाचा दणका

दिपक आबा साळूंखे आमदार झाल्यानंतर निवेदन घेणार आहेत. आमदार शहाजी पाटील यांच्यासाठी गुवाहटीचे रेल्वेचे तिकीट बुक करण्यात येणार आहे. त्यानंतर ते तिकडे काय झाडी काय डोंगर बघु द्या, त्याला. ते त्या ठिकाणचे झाडे मोजण्याचे काम करतील. गद्दारी करून त्यांनी आयुष्याची राखरांगोळी केली आहे. केवळ गद्दारांना गाड्याला आलो असून येत्या काळात त्यांचा माज उतरवायचा आहे, असा इशारा ठाकरेनी यावेळी दिला.

Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis
Beed Assembly Constituency : `योगेश, तुझ्याकडे उत्कृष्ट लोकप्रतिनिधी बनण्याचे गुण`, अजित पवारांनी पाठ थोपटली

शिवसेनेसोबत (Shivsena) गद्दारी करणाऱ्याना महाराष्ट्र कधीही क्षमा करत नाही, हा इतिहास आहे. अशा मंडळींचा महाराष्ट्रातील जनता कडेलोट करेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी भर सभेत दिला. हे लोक मुंबई अदानीच्या घशात घालण्याचे काम करत असल्याची टीका ठाकरेंनी केली. यांचे सरकार जर परत आले तर तुमच्या सातबाऱ्यावर देखील अदानीचे मनाव आले तर काय करणार? असा सवाल उद्धव टाकरेंनी केला. अदानींच्या घशातून काढून भुमिपुत्रांना तिथं परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन देऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis
Ajit Pawar : गावातील पोलिस स्टेशन बांधले नाही अन् निघाले राज्याचे नेतृत्व करायला; अजित पवार-जयंत पाटलांमध्ये वार- पलटवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com