Uniform Civil Code : अमित शाहांच्या घोषणेनंतर समान नागरी कायदा लागू करण्याबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले,'महाराष्ट्रात समितीचा अहवाल प्राप्त होताच...'

Maharashtra UCC process News : राज्यात समान नागरी कायदा लागू होण्याची मार्ग मोकळा झाला असताना त्याच मुद्द्यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मोठे विधान केले.
Amit Shah-Devendra Fadnavis
Amit Shah-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसापासून मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी एनडीएची सत्ता असलेल्या 21 राज्यांमध्ये 2029 पूर्वी समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात समान नागरी कायदा लागू होण्याची मार्ग मोकळा झाला असताना त्याच मुद्द्यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मोठे विधान केले. समान नागरी कायदा तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आधीच सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकार पुढील प्रक्रिया सुरू करणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

नागपुरात होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा मांडण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. त्याची तयारी केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समान नागरी कायदा तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आधीच सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती सध्या कायद्याच्या आराखड्यावर काम करत आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकार पुढील प्रक्रिया सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकारने समान नागरी कायदा तयार करण्यासाठी आधीच समिती स्थापन केली आहे. समितीचे काम सुरू आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही लवकरच त्याची अंमलबजावणी करू. सरकारने जुलै महिन्यात UCC साठी सात सदस्यीय समितीची स्थापना केली होती. या समितीला आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. समितीचे काम पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून UCC लागू करण्याच्या दिशेने प्रक्रिया सुरू केली जाणार आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Amit Shah-Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल : देवेंद्र फडणवीसांच्या काकांचे मोठे विधान

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची सत्ता असलेल्या 21 राज्यांमध्ये 2029 पूर्वी समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे म्हटले होते. त्यानंतर दुसऱ्यादिवशीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे महाराष्ट्रातही UCC लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. आता समितीचा अहवाल कधी सादर होतो आणि हिवाळी अधिवेशनात UCC विधेयक मांडले जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Amit Shah-Devendra Fadnavis
​Shivsena UBT: उद्धव ठाकरेंचे आणखी १४ ते १५ आमदार फुटणार; केंद्रीय मंत्र्याचा पुण्यात मोठा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com