​Shivsena UBT: उद्धव ठाकरेंचे आणखी १४ ते १५ आमदार फुटणार; केंद्रीय मंत्र्याचा पुण्यात मोठा दावा

Ramdas Athawale, Uddhav Thackeray MLAs, Maharashtra Politics: पुण्यातील पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंचे आणखी १४–१५ आमदार फुटण्याचा दावा केला. शरद पवार, महिला आरक्षण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले.
Ramdas Athawale Election 2029
Ramdas Athawale Election 2029Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध राजकीय मुद्द्यांवर त्यांच्या खास शैलीत फटकेबाजी केली. महिला आरक्षणापासून ते महाविकास आघाडीतील संभाव्य आमदार फुटीपर्यंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

केंद्रातील महिला आरक्षण विधेयकावर बोलताना आठवले म्हणाले, "पूर्वी विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला होता. मात्र, आता आमच्याकडे संसदेत संख्या बळ वाढले आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक नक्कीच मंजूर होईल. आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत महिलांना अधिक जागा मिळतील. तसेच मतदारसंघांची पुनर्रचना करणारे डीलिमिटेशन बिलही बहुमताच्या जोरावर नक्की पास होईल."

Ramdas Athawale Election 2029
Uddhav Thackeray : आधी विमानाने एकत्र प्रवास, मग सावधानतेचा इशारा... अन् आता थेट ठाकरेंकडून फडणवीसांच्या खुर्चीसाठीच प्रार्थना

महाविकास आघाडीकडून होणार्‍या पक्षफुटीच्या आरोपांना उत्तर देताना आठवले म्हणाले, "आम्ही पक्ष फोडतो हा आरोप चुकीचा आहे. ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांना त्यांचे खासदार-आमदार सांभाळता येत नाहीत. ऑपरेशन टायगर वगैरे काही नसून, हे त्यांचेच वैयक्तिक ऑपरेशन आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार डावलून उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत गेले, त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली."

सद्यस्थितीत उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या २० आमदारांपैकी आणखी १४ ते १५ आमदार फुटण्याची शक्यता आहे. ते महायुतीत आले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारून त्यांचे स्वागतच केले जाईल," असा दावा आठवलेंनी केला.

तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते

राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सोबत येणार असल्याच्या चर्चा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाच्या चर्चा सुरू आहेत त्याबाबत बोलताना आठवले म्हणाले, शरद पवार हे मोठे नेते आहेत. २०१४ किंवा २०१९ मध्ये ते जर एनडीए सोबत आले असते, तर ते देशाचे राष्ट्रपती झाले असते.

Ramdas Athawale Election 2029
ShivsenaUBT News: आदित्य ठाकरेंचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं हे शेवटचं अधिवेशन...'

तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणाबाबत बोलताना आठवले म्हणाले, अजित पवार सोबत असताना अनेक मोठे निर्णय झाले. सुप्रिया सुळे यांनाही केंद्रात मंत्री करायचे ठरले होते, अशा चर्चा होत्या. पण आता अजित पवार नसल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असे वाटत नाही. तसेच तेव्हा पवार साहेबांनी एनडीए सोबत यायला हवे होते. असे आठवले म्हणाले.

२०२९ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवर बोलताना आठवले म्हणाले, "मा‍झ्या मते देवेंद्र फडणवीस हे २०२९ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. ते सर्व घटकांना न्याय देत आहेत, त्यामुळे सध्या त्यांना दिल्लीत नेण्याची कोणतीही आवश्यकता नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com