Pune MLC Elections : ‘पेनमध्ये कॅमेरा, खिशात कॅश!’ निवडणुकीत पैसे वाटप? भाजपवर ‘स्पायकॅम पॅटर्न’चा आरोप; सुप्रिया सुळेंकडून चौकशीची मागणी

BJP Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारे असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नयेत.
Supriya Sule Vs BJP
Supriya Sule Vs BJP sarkarnama
Published on: 
Updated on: 

Supriya Sule News : पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाकडून पैसेवाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मतदारांच्या खिशाला असे पेन लावून, भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि मतदानानंतर तो दाखविल्यावर ठरलेले पैसे द्यायचे, असा प्रकार सुरू असल्याचे मतदार सांगत आहेत, असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, या तक्रारी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहेत. मतदानाची गोपनीयता आणि मतदारांचे स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या या प्रकाराची निवडणूक आयोगाने व शासनाने तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.

लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारे असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नयेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडलीच पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

कौस्तुभ गावडेंचा व्हिडिओ दाखवला

सुळे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा मतदान करतानाचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये गावडे हे भाजपी निशाणी असलेला गमछा गळ्यात घालून मतदान करत असताना दिसत आहे.

मतदान केंद्रावर पक्षीय ओळख बाजूला ठेवून एक सामान्य मतदार म्हणून जाणे अपेक्षित असते. लोकशाहीच्या या पवित्र प्रक्रियेचे पावित्र्य आणि मतदान केंद्राची निष्पक्षता प्रत्येकाने जपली पाहिजे. उमेदवाराला पक्षाचे चिन्ह गळ्यात परिधान करुन मतदान केंद्रावर प्रवेश कसा दिला? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे.

Supriya Sule Vs BJP
Pune MLC Election News : शिक्षकचा भाव फुटला! मताला 10 हजार, राजू शेट्टी म्हणाले, 'श्याम' सारखे...

आचारसंहितेचा भंग?

ही सवलत केवळ सत्ताधारी उमेदवारालाच का दिली जाते? हा आदर्श आचारसंहितेचा भंग नाही का? तुम्ही सदर उमेदवारांवर नेमकी कोणती कारवाई करणार आहात याचे उत्तर महाराष्ट्र शासन, निवडणूक आयोगाने दिले पाहिजे, असे देखील सुळे यांनी म्हटले आहे.

Supriya Sule Vs BJP
MLC Election Voting Rules : पदवीधर निवडणुकीत असे करा मतदान, अन्यथा तुमचे मत ठरेल बाद!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com