Rajya Sabha MLC Elections : राज्यसभेच्या 12 अन् विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी घमासान; भाजपसमोर सर्वात मोठं आव्हान...

Rajya Sabha and MLC elections 2026: राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकीत यूपी, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटकात भाजपची जेन झी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लिटमस टेस्ट.
The Election Commission has announced elections for 12 Rajya Sabha seats and 28 Legislative Council seats.
Maharashtra Legislative Council election 2026Sarkarnama
Published on
Updated on

Legislative Council elections updates: देशातील पाच राज्यांमध्ये पुन्हा एका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी १२ राज्यसभा आणि २८ विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यसभेसाठी १६ ऑक्टोबर तर विधानपरिषदेसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये लिटमस टेस्ट

उत्तर प्रदेशात एकाचवेळी राज्यसभेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तर विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात आहे. पदवीधरच्या पाच आणि शिक्षक मतदारसंघाच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे.

जेन झी, भरती प्रक्रियेविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील विधानपरिषदेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसमोर या निवडणुकीत विजय मिळविण्याचे आव्हान असणार आहे. या निवडणुकांमधील निकालातून आगामी विधानसभेच्या निकालांचे आडाखे राजकीय पक्षांकडून बांधले जातील.

The Election Commission has announced elections for 12 Rajya Sabha seats and 28 Legislative Council seats.
Supreme Court news : शिवसेना प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणाने वाढली धडधड; मतदारांचा मुद्दा ठरणार महत्वाचा, नेमका अर्थ काय?

बिहारमध्येही परीक्षा

बिहारमध्येही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आठ जागांसाठी मतदान होणार आहे. बिहारमध्येही जेन झी आणि भरती परीक्षेविरोधातील आंदोलनाचा भडका उडाला होता. राज्यात पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद मिळालेल्या भाजपला वर्षभरातच निवडणुकीच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या राज्यातही भाजपसमोर विजयाचे आव्हान असणार आहे.

महाराष्ट्राकडेही लक्ष

महाराष्ट्रात पदवीधरच्या तीन आणि शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागांसाठी मतदान होणार आहे. एमपीएससी विद्यार्थी, जेन झी आंदोलनाने महाराष्ट्रही पिंजून काढला होता. आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलनाही चांगलेच पेटले होते.

अजूनही एमपीएससी परीक्षा घोटाळ्याची धग आहे. त्यातच या निवडणुका होत असल्याने प्रामुख्याने पदवीधर मतदारसंघांतील निवडणुकीत त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यूपी बिहारपाठोपाठ महाराष्ट्रातही सत्ताधारी भाजपला विजयासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

The Election Commission has announced elections for 12 Rajya Sabha seats and 28 Legislative Council seats.
Defamation case update : मोदी सरकारमधील माजी अर्थ सचिवांवर भाजप खासदारानेच ठोकला मानहानीचा दावा; म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था बुडविणाऱ्या...

कर्नाटकात प्रतिष्ठा पणाला

कर्नाटकात काही दिवसांपूर्वीच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केले होते. आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येकी दोन मतदारसंघात निवडणूक होणार आहे.

भाजपकडून सत्ताधारी काँग्रेसविरोधात जनतेचा रोष असल्याचा दावा केला जात आहे. या निवडणुकीत भाजपला विजय मिळवत जनता सरकार विरोधात असल्याचे दाखवून द्यावे लागणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राज्यसभेची रणधुमाळी

उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या १० आणि उत्तराखंडमध्ये एका जागेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या रुक्मिणी मलिक यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. बंगाल आणि उत्तराखंडमध्ये भाजपच्या पदरात या जागा सहजपणे पडतील. मात्र, उत्तर प्रदेशात काही जागांसाठी भाजपविरुध्द समाजवादी पक्ष असा सामना होईल.

विधानपरिषद निवडणुकीचे वेळापत्रक

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - ६ ऑक्टोबर

अर्ज माघार - ९ ऑक्टोबर

मतदान - २३ ऑक्टोबर

मतमोजणी - २७ ऑक्टोबर

राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - ६ ऑक्टोबर

अर्ज माघार - ९ ऑक्टोबर

मतदान व मतमोजणी - १६ ऑक्टोबर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com