Maratha Vidya Prasarak : ‘२० कोटींचा निधी मिळवून द्या, सत्कार करतो’ : 'मविप्र'च्या मेडिकल कॉलेजच्या प्रश्नावर नितीन ठाकरेंचा विरोधकांवर पलटवार

MVP Medical College Land Extension : तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही संस्थेच्या कार्यक्रमात याबाबत आश्वासन दिले होते. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नागपूर तसेच मुंबई येथे चर्चा करण्यात आली.
Maratha Vidya Prasarak Samaj
Maratha Vidya Prasarak SamajSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या शासकीय जागेच्या मुदतवाढीच्या प्रश्नावरून संस्थेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांकडून मुदतवाढ मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून दिरंगाई झाल्याचे करण्यात येणारे आरोप संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी फेटाळून लावत, मागील कार्यकारिणीच्या कार्यकाळात अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे सध्याच्या अडचणी निर्माण झाल्याचा दावा केला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या शासकीय जागेच्या मुदतवाढीचा प्रश्न मागील कार्यकारिणीच्या काळातच प्रलंबित राहिला. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेसह अन्य बाबींमध्ये अडचणी निर्माण झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले. सध्याची कार्यकारिणी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मागील कार्यकारिणीची मुदत संपण्यापूर्वी तत्कालीन सरचिटणिसांनी १ ऑगस्ट २०२० ला प्रशासनाला केवळ एक पत्र दिले. त्यानंतर या विषयाचा पाठपुरावा झाला नाही. सध्याच्या कार्यकारिणीने मात्र सातत्याने पाठपुरावा केला. शासन निर्णयाचा दाखला देत प्रशासनाने वार्षिक एक कोटी आठ लाख ५० हजार रुपये भाडे आकारण्याचे पत्र दिले होते. संस्थेला नाममात्र एक रुपया शुल्कात जागा मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीसांकडे प्रश्न

तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही संस्थेच्या कार्यक्रमात याबाबत आश्वासन दिले होते. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नागपूर तसेच मुंबई येथे चर्चा करण्यात आली. या पाठपुराव्यामुळे प्रश्न मार्गी लागला असून, संबंधित शासन निर्णय नवीन भाडेकरारांसाठी आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लागून संस्थेला नाममात्र शुल्कात जागा उपलब्ध होणार असल्याचे अॅड. ठाकरे यांनी सांगितले.

Maratha Vidya Prasarak Samaj
Caste Validity: जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यालये सुटीच्या दिवशीही सुरू राहणार; बार्टीच्या महासंचालकांचा मोठा निर्णय

कोविड काळातील २० कोटींचा निधी प्रलंबित

कोविडच्या काळात मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णांवर उपचार केले होते. या उपचारांचा सुमारे २० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडे अद्याप प्रलंबित असल्याचा दावा नितीन ठाकरे यांनी केला. विरोधकांनी या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करून तो संस्थेला मिळवून द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले. हा निधी संस्थेला मिळवून दिल्यास विरोधकांचा आपण स्वतः सत्कार करू, असे ठाकरे यांनी म्हटले.

‘मागच्या कार्यकारिणीला साधा रस्ताही...’

मविप्रच्या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीकडे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा प्रश्नही मागील कार्यकारिणीच्या काळात प्रलंबित राहिला होता, असा दावा ठाकरे यांनी केला. विद्यमान कार्यकारिणीने हा प्रश्न मार्गी लावला असून, आता कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २८ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संस्थेच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना उत्तर देताना विद्यमान कार्यकारिणीने मागील कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Maratha Vidya Prasarak Samaj
Beed News : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख! सभापतींच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले

मविप्रच्या राजकारणाला नवा ट्विस्ट

मविप्र संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न हा केवळ संस्थेपुरता मर्यादित नसून नाशिकच्या राजकारणातही त्याला महत्त्व आहे. त्यामुळे या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी गटाला राज्य सरकार आणि विविध राजकीय नेत्यांच्या माध्यमातून करावा लागत असलेला पाठपुरावा, तसेच मागील कार्यकारिणीच्या कारभारावर नितीन ठाकरे यांनी केलेले आरोप यामुळे मविप्रच्या अंतर्गत राजकारणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com