Caste Validity: जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यालये सुटीच्या दिवशीही सुरू राहणार; बार्टीच्या महासंचालकांचा मोठा निर्णय

Caste Validity: जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटी तत्काळ दूर करण्याचं ‘बार्टी’चं विद्यार्थ्यांना आवाहन
BARTI
BARTI
Published on
Updated on

Pune Barti News : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भातील अर्जांमधील त्रुटी तातडीने दूर करण्याचे आवाहन असे आवाहन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे’च्या (बार्टी) महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची कार्यालये सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

BARTI
Beed News : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख! सभापतींच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील उच्च व तंत्रशिक्षण, कृषी, वैद्यकीय आणि कला विभागाच्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेशाच्या तारखा जाहीर झाल्या असूनही, अनेक विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी समित्यांकडे उशिराने अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे.

BARTI
राजस्थानचे तुकाराम मुंढे माहितीएत का? 33 वर्षात झाली 30 वेळा बदली!

अनेक पात्र विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी समित्यांमार्फत विद्यार्थ्यांना एसएमएस, ईमेल आणि पत्राद्वारे वारंवार कळविण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही त्रुटींची पूर्तता केलेली नाही, त्यांनी तत्काळ संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘बार्टी’तर्फे करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com