Employees Society : साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. निवडणुकीसाठी 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी 133 जणांपैकी 80 जणांनी माघार घेतली. सोसायटीसाठी 11 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. (Employees Society Election)
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वत्र राजकीय वारे वाहू लागले आहे. गावापासून ते दिल्लीपर्यंत निवडणुकांवर चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे गावच्या खरेदी - विक्री संघ, मजूर संस्था, सोसायटीच्या देखील निवडणुका रंगतदार होत आहेत. शिर्डी येथील साईबाबा संस्थान एम्प्लाॅईज क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र आहे.
तीन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असल्याने बाजी कोण मारणार याकडे लक्ष लागले आहे. सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी साईबाबा संस्थान एम्प्लाॅईज सोसायटीच्या निवडणुकीत पडद्यामागे बराच राजकीय गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ताधारी गटाच्या माजी अध्यक्षा श्रद्धा कोते आणि तुषार शेळके यांनी निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे सत्ताधारी गटाच्या जनसेवा पॅनलचे नेतृत्व यादवराव कोते आणि प्रताप कोते हे करणार आहेत. विद्यमान संचालक विठ्ठल पवार हे परिवर्तन पॅनल, तर माजी चेअरमन राजेंद्र जगताप हे साई हनुमान जनसेवा पॅनलचे नेतृत्व करणार असल्याने निवडणूक तिरंगी होणार आहे. अरुण जाधव हे स्वतंत्र पॅनल तयार करण्याच्या तयारी होते. परंतु त्यांनी ऐनवेळी साई जनसेवा पॅनलकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोसायटीचे 1 हजार 666 सभासद आहे.
निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. यानंतर प्रचाराचा ज्वर चढेल. 11 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मतदानासाठी 10 दिवस राहिल्याने तिन्ही पॅनलकडून सत्ता खेचण्यासाठी जोरदार प्रचार होणार आहे. तीन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असल्याने लढत साधी आणि सोपी नाही. त्यामुळे निवडणूक रंगतदार होईल, असे सांगितले जात आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.