

Nashik : ''भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष असून त्यांना सल्ला देण्याइतपत मोठा नाही. त्यांच्यावर आम्ही नाराज नाही, राग देखील नाही. आम्ही भाजपसोबत असून आम्हाला विधानसभेला, लोकसभेला जागा मिळाली नाही. आम्ही बंडखोरी करुन शेवटी आमचा आमदार निवडून आणला. त्यामुळे आम्ही एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं डांबरीकरण आहे. दुसऱ्या बाजूला राहुल गांधींचं काँक्रिटीकरण आहे. माझा मी मध्ये छोटासा मार्ग काढत आहे'' असं विधान रासपचे महादेव जानकर यांनी केलं आहे.
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर(Mahadev Jankar) यांनी सोमवारी(दि.२६) नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसह एनडीए, भाजप यांच्याविषयीही रोखठोक भाष्य केलं. जानकर म्हणाले, आम्ही म्हणतो एनडीएत आहे. पण ते जाहीरपणे म्हणत नाही. पण आम्हाला लोकसभेला जागा मिळाली नाही. त्यामुळे आम्ही स्वतःच्या हिंमतीवर पक्ष चालवतो. आम्ही म्हणतो एनडीएत आहे. पण ते जाहीरपणे म्हणत नाही. ज्यावेळी माझे 50 आमदार असतील, त्यावेळी मी बोलेल असं असंही जानकर यावेळी म्हणाले.
भाजपनं मित्रपक्षांची वाट लावली...
शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार सांगणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला सोबत घेतलं नाही. आम्ही भाजपला म्हणणार नाही, आम्हाला काही द्या. त्यांनी आम्हाला जागा द्याव्या. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद द्यावं, आमचं हेलिकॉप्टर जर लँड झालं तर, आम्ही आमची जागा दाखवून देऊ असा इशारा देत त्यांना मित्रपक्षाची गरज आहे. मात्र, त्यांनी मित्रपक्षाची वाट लावली असून त्यामुळे आमची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु असल्याचा दावाही जानकर यांनी केला आहे.
पंकजा मुंडेंना सल्ला देण्याइतपत मोठा नाही....
भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना देण्यात आलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवरही महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जानकर म्हणाले, "पंकजाताई माझी बहीण आहे. त्या एका पक्षाच्या सचिव असून हुशार आहेत. याबाबत त्या स्वतः योग्य तो निर्णय घेतील. मी सल्ला देण्याइतपत मोठा नाही असेही ते म्हणाले.
आमच्या झोपडीला खुणावल्याशिवाय राजमहाल होऊ शकत नाही....
कुठल्याही पक्षाला लोकशाहीत अधिकार असून जनता ही जनार्दन आहे. जनता ठरवेल, बीआरएस पक्षाचे शेतकरी धोरण चांगले आहे. माझ्याशी अजून काही त्यांनी चर्चा केली नसल्याचे ते म्हणाले. तसेच बाहेरच्या राज्यात आम्ही NDA सोबत नाही. राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांच्यापेक्षा आम्हाला मतांची टक्केवारी जास्त आहे. त्यामुळे आमच्या झोपडीला खुणवल्याशिवाय राजमहाल होऊ शकत नाही असा टोलाही महादेव जानकर यांनी लगावला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.