Aaditya Thackeray News : नवनीत राणा यांचा विषय निघताच आदित्य ठाकरे यांचा वेगळाच अविर्भाव, म्हणाले...

Aaditya Thackeray politics | Navneet Rana : आदित्य ठाकरे यांनी राज्यात सरकार आहे की नाही आणि ते कोण चालवतो आहे असा प्रश्न उपस्थित केला.
Aaditya Thackeray Shiv Sena UBT
Aaditya Thackeray Shiv Sena UBTSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज नाशिकला भेट दिली. यावेळी त्यांनी आश्रमशाळांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या युवकांची भेट घेतली. आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेतले. राज्यातील आदिवासी आश्रम शाळांबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यभर शासनाविरुद्ध आंदोलन होत आहे. नाशिक येथे गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची बुधवारी आदिवासी विद्यार्थ्यांनी भेट घेतली होती. राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा दिला होता. या प्रश्नावर गुरूवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे खास नाशिकला आले होते. त्यांनीही या विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

आंदोलन करणाऱ्या आदिवासींचे प्रश्न अतिशय सामान्य आहेत. त्यावर शासनाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र राज्य सरकार त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. सरकारची ही भूमिका जनविरोधी असल्याची प्रतिक्रिया ठाकरे यांनी व्यक्त केली. आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाशी संबंधित मूलभूत प्रश्नांवर आंदोलन सुरू केले आहे. आश्रम शाळा आणि वस्तीगृहातील हे प्रश्न तातडीने सुटणे अपेक्षित आहे, असे ठाकरे म्हणाले.

Aaditya Thackeray Shiv Sena UBT
DM Medha Roopam News : महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या वेतनातून 5 लाखांची भरपाई देण्याचे हायकोर्टाचे आदेश; चुकीचा गुन्हा दाखल करणं पडलं महागात

कोणी काय खावे काय खाऊ नये यावर सरकार आणि सत्ताधारी नेते अतिशय हिरीरीने पुढाकार घेत मत व्यक्त करतात. निर्णय घेतात. मात्र आदिवासी विद्यार्थी उपोषण करीत आहेत त्यावर त्यांना काहीही सोयरसुतक नाही. ही अतिशय निषेधार्य बाब असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

Aaditya Thackeray Shiv Sena UBT
Cabinet minister news : मंत्रिमंडळातून महिला मंत्र्यांची तडकाफडकी उचलबांगडी; काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

यावेळी पत्रकारांनी नवनीत राणा यांच्या विषयी प्रश्न विचारला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी वेगळाच अविर्भाव करत केवळ एकच शब्द उच्चारला आणि प्रश्न उत्तर देणे टाळले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची नवनीत राणा यांच्या प्रश्नावरील प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com